सांगोला/प्रतिनिधी
राज्याचे माजी मंत्री स्व.आ.गणपतराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त वेदांत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये घेण्यात आलेल्या भव्य मोफत सर्वरोग निदान शिबिरात 397 रूग्णांची तपासणी करण्यात आली असून या वेदांत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये घेण्यात आलेल्या मोफत तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
सकाळी 10 वाजत वेदांत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये स्व.गणपतराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन शेकापचे नेते डॉ.बाबासाहेब देशमुख, जेष्ठ पत्रकार विठ्ठल देशपांडे, शिवाजीराव इंगोले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून भव्य मोफत सर्वरोग निदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी डॉ. परेश खंडागळे, डॉ.महावीर आलदर, डॉ.प्रसाद साळे, डॉ.रविंद्र नाईवडी, धर्मराज बोराडे, डॉ.विनायक डमकले, माजी नगरसेवक सतिश सावंत, डॉ.संतोष पाटील, डॉ.बसवेश्वर पाटील, डॉ.प्रद्युम्न कुलकर्णी, डॉ.बसवराज बिराजदार, डॉ.स्वप्नाली बिराजदार, उद्योगपती मनोज ढोबळे, फिरोज खतीब, काँग्रेसचे दत्तात्रय देशमुख, रूपेश माने, भारत गरंडे, वैभव कवडे, सानिका सावंत, माने पॅथॉलॉजीचे माने, सुशील बंडगर, महेश जानकर यांच्यासह वेदांत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमधील डॉक्टर, कर्मचारी स्टाफ व रूग्ण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या भव्य मोफत सर्वरोग निदान शिबिरात एक्स-रे, रक्तातील सीबीसी, साखर, बीएसएल, महिलांचे हिमोग्लोबिन तपासणीसह इतर रक्ताच्या तपासण्या मोफत करून औषधोपचार करण्यात आले. या वेदांत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये तज्ञ डॉक्टरांची टीम 24 तास उपलब्ध आहे. या हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले जन आरोग्य येाजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेतून गोरगरीब रूग्णांवर मोफत शस्त्रक्रिया व उपचार सुरू आहेत.
या योजनेमधून अनेक गोरगरीब रूग्णांना मोफत शस्त्रक्रिया व उपचार झाले आहेत. या वेदांत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये, सुसज्ज अतिदक्षता विभाग (आयसीयु), एनआयसीयु, पीआयसीयु, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, सुसज्ज प्रसुती विभाग, स्वतंत्र ओपीडी, व्हेन्टीलेटर्स, डिजीटल एक्स-रे, अद्यावत सुसज्ज ऑपरेशन थिएटर, सेंट्रल ऑक्सिजन सिस्टीम, इ.सी.सी. सी.ऑर्म, सिरीज पंप, तज्ञ डॉक्टरांच्या भेटी, 24 तास मेडिकल, 24 तास लॅबोरेटरी, अॅम्बुलन्सची सुविधा , सोनोग्राफी, अपेंडिक्स, अल्सर, हर्निया व हायड्रोसील, उच्चरक्तदाब, कॅन्सर रोग निदान व सल्ला, मुत्रविकार, मुतखड्यावर निदान व उपचार, न्युरोसर्जरी, युरोसर्जरी, प्लास्टिक सर्जरी, किडनीचे विकार, टॉन्सिल, नाकातील हाड काढणे, मुळव्याध इंजेक्शन व शस्त्रक्रिया,, प्रसुती, बिनटाका गर्भाशय पिशवी काढणे, सिझेरीयन, गर्भ पिशवी काढणे, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया, गर्भाशयाची पिशवी साफ करणे, कमी दिवसाचे बाळ, कावीळ वाढली असल्यास, बाळाला सतत झटके येत असल्यास न्युमोनिया लहान बालकांच्या ऑपरेशन ची सोय जन्मानंतर लहान बाळ रडले नसल्यास उपचार तसेच मूत्ररोग, मुतखडा, प्रोस्टेट ग्रंथीची सूज, मूत्राशयाचे आजार, किडनीचे आजार, किडनीतील खडे, मूत्रवाहिनी मधील खडे, मूत्राशयातील खडे, मूत्रमार्गातील खडे अन्य मूत्रविकार या सर्व आजारांवर मोफत निदान व मोफत शस्त्रक्रियाया सर्व सुविधा उपलब्ध असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क
संपादक
विजयकुमार कांबळे
मो.नो-; 8888388139/9004537171
Vijaykumarkamble501@gmail.com
Post a Comment