Pundalik Samachar

मंदिर समितीच्या कर्मचा-यांना त्यांच्या हक्काचे लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणा-या मान्यवरांचा कर्मचारी संघाकडून सन्मान.



पंढरपूर/प्रतिनिधि
 श्री. विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूरच्या आस्थापनेवरील सर्व कर्मचा-यांना सहाव्या वेतन आयोगातील संपूर्ण महागाई भत्ता व घरभाडे भत्ता शासन मान्यतेने नुकताच लागू करण्यात आला आहे. सदरबाबत वेळोवेळी सकारात्मक निर्णय घेऊन व शासन स्तरावर पाठपुरावा करून कर्मचा-यांना त्यांच्या हक्काचे लाभ मिळवून देणाऱ्या मान्यवरांचा सन्मान सोहळा रविवार दिनांक 06 ऑगस्ट, 2023 रोजी सायंकाळी 5.00 वाजता श्री संत तुकाराम भवन येथे आयोजित करण्यात आला होता. 

          सदर कार्यक्रमास माननीय सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, माननीय सदस्य श्रीमती शकुंतला नडगिरे, डॉ दिनेशकुमार कदम,  संभाजी शिंदे, ह भ प ज्ञानेश्वर देशमुख जळगांवकर, ॲड माधवी निगडे, ह भ प प्रकाश जवंजाळ, माजी सदस्या सौ साधना भोसले, धर्मादाय उपायुक्त सोलापूर श्रीमती कंकणवार , उपजिल्हाधिकारी विठ्ठल जोशी, कार्यकारी अधिकारी  राजेंद्र शेळके, व्यवस्थापक  बालाजी पुडलवाड, लेखाधिकारी  अनिल पाटील, सेवानिवृत्त लेखाधिकारी  सुरेश कदम या सर्व सन्माननीय महोदयांनी उपस्थित राहून सन्मान स्वीकारला. तसेच सर्व कर्मचाऱ्यांना बहुमोल असे मार्गदर्शन केले. तत्कालीन कार्यकारी अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी सोलापूर  तुषार ठोंबरे  यांनी ऑनलाईन पद्धतीने मार्गदर्शन केले. 

          कार्यक्रमाचे स्वागत व प्रस्ताविक कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष  विनोद पाटील यांनी केले. सचिव  सावता हजारे व  संदीप कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले.  
प्रकाश पाटील यांनी आभार मानले. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  सुधाकर घोडके यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

संपादक
विजयकुमार कांबळे
मो.नो -; 8888388139/9004537171
Vijaykumarkamble501@gmail. com

Post a Comment

Previous Post Next Post