Pundalik Samachar

शरद पवारांमुळे महादेव कोळी आरक्षण मिळाले नाही :-दादा करकंबकर यांचा घणाघात





खर्डीत महर्षी वाल्मिकी संघाच्या शाखेचे उद्घाटन

पंढरपूर/अमोल कुलकर्णी

देशात कोळी समाजच्या पन्नास पेक्षा जास्त उपजाती आहेत पण तहसीलदार ऐवजी जात प्रमाण पत्र पडताळणी विभागीय स्तरावर करायला भाग पाडून विभागीय स्तरावर करायला लावणारे शरद पवार कारणीभूत आहेत.असा घणाघात दादा करकंबकर यांनी खर्डीतील शाखा उद्घाटन प्रसंगी केला.

महर्षी वाल्मिकीनी लिहिलेले "रामायण" याच्या पेक्षा श्रेष्ठ काहीच नाही,कोळी बांधव आणि परिचारक कुटुंबाचे फार पूर्वीपासून ऋणानुबंध आहेत.तुमच्या सर्व प्रश्नांसाठी आम्ही पक्ष पातळीवर कायम बरोबर राहू अशी ग्वाही युवक नेते प्रणव परिचारक यांनी दिली.

तालुक्यातील जिल्हा ग्रामीण तीर्थक्षेत्र असणाऱ्या खर्डी येथे महर्षी वाल्मिकी संघाचे उदघाटन युवक नेते प्रणव परिचारक आणि  अध्यक्ष गणेश अंकुशराव यांच्या उपस्थितीत पार पडले.
गावातील कोळी समाजाची संख्या विचारात घेता हवा तितका विकास झालेला नाही.महादेव कोळी प्रमाण पत्रे वैध ठरत नसल्याने अनेक तरुणांना बेरोजगार राहण्याची वेळ आली असल्याची खंत शाखा अध्यक्ष दत्तात्रय कोळी यांनी बोलून दाखवली.

यावेळी सोलापूर जिल्ह्यातील बहुसंख्य कोळी बांधव पदाधिकारी जमलेले होते.दादासाहेब करकंबकर ,उचेठाणचे सरपंच रमेश कोळी बाबासाहेब आधटराव,शाखा प्रमुख समाधान कोळी, आकाश माने,बिभीषण कोळी,अभिमान कोळी,गणेश भंडारे,तानाजी कोळी,तुषार कांबळे,हणमंत भंडारे,बाळासाहेब बळवंतराव,बब्रुवाहन कोळी आदी सह सरपंच पती भगवान सव्वाशे,उपसरपंच शरद रोंगे,माजी सरपंच रमेश हाके आदी उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क 
विजयकुमार कांबळे 
संपादक 
साप्ताहिक पुंडलिक समाचार , वेब पोर्टल आणि PS न्युज चॅनेल 
मोबाईल नंबर -; 8888388139/9004537171
Vijaykumarkamble501@gmail.com

Post a Comment

Previous Post Next Post