पंढरपूर/प्रतिनिधी
भारताची दक्षिण काशी असा अध्यात्मिक आणि सांप्रदायिक वसा आणि वारसा लाभलेल्या पंढरपूर शहर व तालुक्यातील नागरिकांची सर्व शासकीय व प्रशासकीय कामे एकाच छताखाली होण्यासाठी गेली अनेक वर्षे निधी मंजूरीच्या प्रतीक्षेत असलेल्या व पंढरपूर शहरांमध्ये साकार होणाऱ्या प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी ३२ कोटी, शहरातील विविध रस्ते विकास प्रकल्पसाठी १०४ कोटी त्याचबरोबर पंढरपूर नगरपरिषद अंतर्गत पाणीपुरवठा योजनेसाठी १०८कोटी व श्री.विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती विकास आराखड्यासाठी १५० कोटी असा एकूण ३९५ कोटींचा ऐतिहासिक निधी पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या माध्यमातून मंजूर झाल्याने पंढरपूरचे प्रांताधिकारी गजानन गुरव व नगरपरिषद मुख्याधिकारी जाधव यांच्या हस्ते आमदार समाधान आवताडे यांचा अभिनंदनपर करण्यात आला आहे.
येथील स्थानिक प्रशासकीय अधिकारी, पदाधिकारी व इतर कर्मचारी यंत्रणा यांच्याशी समन्वय ठेवून शहराच्या विकासासाठी सतत प्रयत्नशील असणारे लोकप्रतिनिधी आमदार इतर विकासात्मक बाबींची पूर्तता करण्यासाठी आमदार समाधान आवताडे यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये पुरवणी मागण्यांच्या अनुषंगाने हा भरघोस निधी खेचून आणल्याबद्दल पंढरपूर प्रशासकीय विभाग व शहरवासीयांच्या वतीने यथोचित सन्मान करुन त्यांच्या विकासाभिमुख कार्याप्रती पंढरपूर शहर वासियांच्यावतीने कृतज्ञता आणि समाधान व्यक्त करण्यात आले आहे.
देशातील प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक असणाऱ्या पंढरपूर शहराचे तीर्थक्षेत्र वैभव विविध मूलभूत व पायाभूत विकास कामांच्या आणि निधीच्या रूपाने भक्कम करण्यासाठी तसेच विकासाच्या रूपाने परिवर्तनशील पंढरपूर शहराच्या निर्मितीसाठी आमदार आवताडे यांनी वरील विकास कामांच्या निधी मंजुरीसाठी हिवाळी अधिवेशनामध्ये आपल्या मागण्यांचा रेटा लावून धरला होता. आमदार आवताडे यांच्या या मागण्यांची दखल घेऊन मंजूर झालेल्या या निधीबद्दल शहरातील स्थानिक नागरिकांनी व प्रशासकीय यंत्रणांनी आमदार महोदय यांचे विशेष अभिनंदन केले आहे.
मंजूर झालेल्या वरील निधीतून पंढरपूर शहरातील अंतर्गत विविध रस्ते, पाणीपुरवठा विकास कार्यक्षेत्रातील निरनिराळ्या पाणी योजना व झोपडपट्टी भागातील नागरिकांना मूलभूत व पायाभूत विकास योजना नेण्यासाठी धोरणात्मक प्रगतीची चाके आणखी वेगाने गतिमान होणार असल्याचे चित्र शहरवासी नागरिकांमध्ये निर्माण झाले आहे.
आपल्या परिसरातील बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क
विजयकुमार कांबळे
मुख्य संपादक
साप्ताहिक पुंडलिक समाचार , वेब पोर्टल आणि PS न्युज चॅनेल
मोबाईल नंबर -; 8888388139/9004537171
Vijaykumarkamble501@gmail. com
Post a Comment