पंढरपुर/ विशेष प्रतिनिधी
विधानसभेचे विरोधी पक्षनेते ना अंबादास दानवे हे आज दि 17 रोजी पंढरपुर येथे आले होते. त्यावेळी राज्यातील महादेव, मल्हार, टोकरे ,ढोर कोळी जमातीच्या जात व जातवैधता प्रमाणपत्राच्या प्रश्नासंदर्भात कोळी जमातीच्या शिष्टमंडळाने भेट घेतली आहे. ही भेट शिवसेना उपनेते शरद दादा कोळी यांनी घडवुन आणली .
यावेळी कोळी जमातीचे अभ्यासक प्रा. बाळासाहेब बळवंतराव यांनी राज्याच्या 31 जिल्ह्यातील महादेव मल्हार टोकरे ढोर कोळी जमातीच्या जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्राच्या प्रश्न संदर्भात सखोल माहिती दिली व आदिवासीचे 25 आमदार व 4 खासदार कोळी जमातीला जात प्रमाणपत्रापासून व जात वैधता प्रमाणपत्रापासून वंचित ठेवत आहेत . त्यामुळे समाजावर प्रचंड अन्याय होत आहे .2011 च्या जनगणेनुसार राज्याच्या 36 जिल्ह्यातील 1 कोटी 5 लाख 10 हजार 213 ही लोकसंख्या गृहीत धरून विधानसभेचे 25 आमदार निश्चित केले आहेत. लोकसभेचे 4 खासदार निश्चित केले आहेत. व 9.35% प्रमाणे आदिवासी विकास निधीची तरतूद ही केली जात आहे. परंतु जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र देताना मात्र हे आदिवासी मंत्री व आमदार प्रांताधिकार्यावर दबाव टाकून जात प्रमाणपत्र व पडताळणी समितीच्या अधिकाऱ्यांना जात वैधता प्रमाणपत्र देऊ देत नाहीत. त्यामुळे अनुसूचित जमातीच्या पात्र यादीत 28, 29, 30 नंबरवर अनुक्रमे कोळी, ढोर कोळी, कोळी महादेव, मल्हार कोळी असून सुद्धा स्वातंत्र्याच्या 78 वर्षानंतरही न्याय मिळाला नाही असे त्यांनी सांगितले आहे.तसेच शिवसेना उपनेते शरद दादा कोळी यांनीही अन्यायग्रस्त आदिवासी महादेव, मल्हार, टोकरे ,ढोर कोळी जमातीची लोकसंख्या 70 लाख असुन समाजाचा प्रश्न सोडवल्यास महाविकास आघाडीचे 65 ते 70 आमदार निवडून येऊ शकतात. त्यामुळे या प्रश्नात लक्ष घालण्याची विनंती केली आहे .
यावेळी विधानसभेचे विरोधी पक्ष नेते ना.अंबादास दानवे यांनी बुधवार दिनांक 21ऑगस्ट रोजी विधानभवनात संबंधित अधिकाऱ्यासमवेत आदिवासी कोळी समाजाच्या शिष्टमंडळाची बैठक घेऊन तातडीने जात व जातवैधता प्रमाणपत्राचा प्रश्न सोडवून न्याय देणार असल्याचे सांगितले आहे.
यावेळी शिवसेना उपनेते शरद दादा कोळी ,कोळी जमातीचे अभ्यासक प्रा. बाळासाहेब बळवंतराव, सेवानिवृत्त पीआय हनुमंतराव माने , भारतदादा करकमकर, दुर्गाताई माने ,गणेश कांबळे, अथर्व बळवंतराव यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
👉 आपल्या परिसरातील बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क
विजयकुमार कांबळे
मुख्य संपादक
साप्ताहिक पुंडलिक समाचार , वेब पोर्टल आणि PS न्युज चॅनेल
मोबाईल नंबर -; 8888388139/9004537171
Vijaykumarkamble501@gmail. com
Post a Comment