पंढरपूर/ विशेष प्रतिनिधी
राज्यातील अन्यायग्रस्त महादेव, मल्हार,टोकरे, ढोर कोळी जमातीला अनुसूचित क्षेत्रातील कोळी जमाती प्रमाणे जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र देण्याचा शासन आदेश काढून देतो म्हणून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोलापूर या ठिकाणी राज्यव्यापी आमरण अन्नत्याग उपोषण स्थगित करायला लावले परंतु शासन आदेश काढून दिला नाही. त्यामुळे राज्यातील महादेव, मल्हार ,टोकरे, ढोर कोळी जमातीचा, जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विश्वासघात केला असून या विश्वासघाताचा बदला विधानसभा निवडणुकीत घेणार असल्याचे मत महादेव कोळी जमातीचे अभ्यासक व धाडस सामाजिक संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रा.बाळासाहेब बळवंतराव यांनी बोलताना सांगितले आहे.
राज्यातील अधिसूचित क्षेत्रातील महादेव, मल्हार ,टोकरे, ढोर कोळी जमातीप्रमाणे आधिसूचित क्षेत्राच्या बाहेर राहणाऱ्या महादेव, मल्हार,टोकरे, ढोर कोळी जमातीला जात व जात वैधता प्रमाणपत्र देण्यात यावे असा शासन आदेश काढावा या प्रमुख मागणीसाठी धाडस सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शरद दादा कोळी यांच्या नेतृत्वाखाली महादेव कोळी जमातीचे अभ्यासक व धाडस सामाजिक संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संघर्ष योद्धा प्रा.बाळासाहेब बळवंतराव ,दत्ताभाऊ सुरवसे, अभिमान घंटे, माशाप्पा कोळी ,सुरज खडाखडे हे 25 सप्टेंबर पासून जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर या ठिकाणी आमरण अन्न त्याग उपोषणाला बसले होते.
जिल्ह्यसह राज्यातील 50 हजार कोळी समाज बांधवांनी उपोषणस्थकाला भेट देऊन राज्य शासनाच्या विरोधात आक्रोश व्यक्त केला होता. नवव्या दिवशी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपोषण स्थळाला भेट दिली व अधिसूचित क्षेत्राप्रमाणे अधिसूचित क्षेत्राच्या बाहेर राहणाऱ्या महादेव, मल्हार ,टोकरे, ढोर कोळी जमातीच्या लोकांनाही जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र देण्यात यावे .असा शासनआदेश काढून देतो आंदोलन थांबवा. असे आश्वासन दिल्याने आमरण अन्नत्याग उपोषण स्थगित करण्यात आले होते.
परंतु चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील महादेव, मल्हार, टोकरे ,ढोर कोळी जमातीच्या लोकांना आश्वासनाप्रमाणे शासनआदेश काढून दिला नाही. त्यामुळे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी समाजाचा विश्वासघात केला आहे. असा आरोप केला असून या विश्वासघाताचा बदला आगामी विधानसभा निवडणुकीत घेणार असल्याचे मत प्रा. बाळासाहेब बळवंतराव यांनी बोलताना व्यक्त केला आहे.
गेली दहा वर्ष झाले आधिसूचित क्षेत्राच्या बाहेरील महादेव मल्हार टोकरे ढोर कोळी जमातीचे आदिवासी बांधव लोकशाही मार्गाने वेगवेगळे आंदोलन करत आहेत. परंतु हे जातीयवादी आरक्षणविरोधी भारतीय जनता पार्टीचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, चंद्रकांत पाटील, चंद्रशेखर बावनकुळे ,रावसाहेब दानवे यांनी समाजाला फसवले आहे.
राज्याच्या 65 ते 70 मतदार संघात महादेव मल्हार टोकरे ढोर कोळी जमातीचे निर्णायक मतदान असून 70 लाख मतांचा गट्टा आहे. त्यामुळे या विश्वासघातकी सरकारला सत्तेतून खाली खेचल्याशिवाय अन्यायग्रस्त महादेव मल्हार टोकरे ढोर कोळी जमातीचे बांधव गप्प बसणार नाहीत.
तसेच अधिसूचित क्षेत्राच्या बाहेर राहणाऱ्या महादेव, मल्हार, टोकरे, ढोर कोळी जमातीच्या बांधवांचे जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र अडवून उच्च शिक्षणापासून वंचित ठेवणाऱ्या, प्रगतीची सर्व दारे बंद करणाऱ्या ,तसेच समाजाला बोगस, घुसखोर, नाम सदृश्य म्हणून हिणवणाऱ्या तसेच समाजाला उद्ध्वस्त करणाऱ्या भारतीय जनता पार्टी ,शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवाराच्या अन्यायग्रस्त महादेव मल्हार टोकरे ढोर कोळी जमातीच्या लोकांनी विरोधात मतदान करावे असे आव्हान कोळी जमातीचे अभ्यासक, संघर्षयोद्धा प्रा . बाळासाहेब बळवंतराव यांनी केले आहे .
👉 आपल्या परिसरातील बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क
विजयकुमार कांबळे
मुख्यसंपादक
साप्ताहिक पुंडलिक समाचार , वेब पोर्टल आणि PS न्युज चॅनेल
मोबाईल नंबर -; 8888388139/9004537171
Vijaykumarkamble501@gmail. com
Post a Comment