छत्रपती संभाजीनगर /प्रतिनिधी
1827 पासून परंपरा, शुद्धता, विश्वास,पारदर्शकता,नाविन्यता या पंचसूत्रांवर आधारित विश्वास संपादन केलेल्या चंदुकाका सराफ ज्वेल्स् यांच्या छ. संभाजीनगर सुवर्ण दालनाचा भव्य शानदार शुभारंभ गुरूवार दि.३ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी 11 वाजता महाराष्ट्राचे गृहनिर्माण, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे व चंदुकाका सराफ ज्वेल्स्चे संचालक अतुल जिनदत्त शहा, सौ.संगीता अतुल शहा यांच्या हस्ते व सिध्दार्थ अतुल शहा, सौ.डॉ अंकिता शहा,आदित्य अतुल शहा, सौ.स्वीटी बागी, साहस बागी, डॉ. राजेश फडे, डॉ.विवेक देशमुख, वसंतराव देशमुख व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत जालना रोड, सिडको, एन ३, छत्रपती संभाजीनगर येथे संपन्न झाला.
माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनीही दालनाला भेट देऊन शुभेच्छा दिल्या. सकाळ पासूनच संभाजीनगरकरांनी दागिने खरेदीसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता.
यावेळी मनोगत व्यक्त करताना ना.अतुल सावे यांनी चंदुकाका सराफ ज्वेल्स् यांचे छ. संभाजीनगर शहरात त्यांची शाखा सुरू केल्याबद्दल विशेष अभिनंदन केले. यामुळे छ.संभाजीनगर शहराच्या विकासाला चालना मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी सर्व मान्यवरांचा सत्कार चंदुकाका सराफ ज्वेल्स् च्या वतीने अतुल शहा, सिध्दार्थ अतुल शहा, आदित्य अतुल शहा यांनी केला.
उद्घाटनानिमित्त चंदुकाका सराफ ज्वेल्स् यांनी दिनांक ३ ऑक्टोबर ते ११ ऑक्टोबर या कालावधीत अनेक ऑफर्स उपलब्ध केल्या आहेत.यामध्ये रुपये १९,०००/- पासून पुढील दागिने खरेदीवर अनेक आकर्षक बक्षिसे मिळवण्याची संधी ग्राहकांना प्राप्त होणार आहे. यामध्ये १ बीएचके फ्लॅट, स्कूटर, लॅपटॉप,मोबाईल जिंकण्याची संधी ग्राहकांना मिळणार असून सोबत ३००० रुपयांच्या पुढील योजनेतील गुंतवणुकीवर हमखास भेटवस्तू मिळणार आहे.
यावेळी बोलताना अतुल शहा म्हणाले की, कृषी आणि उद्योगांचे महत्वाचे केंद्र असलेल्या व ऐतिहासिक, धार्मिक वारसा लाभलेल्या छ.संभाजीनगर शहरात सुरू होत असलेली चंदुकाका सराफ ज्वेल्स् ची ही चौदावी शाखा आहे.शुद्ध सोने, माफक घडणावळ, चांदीचा शुद्धतेनुसार दर, परंपरा व नाविन्याचा मेळ साधणारी सोने व हिरेजडीत दागिन्यांची आकर्षक डिझाइन्स, लाईटवेट दागिन्यांची भरपूर व्हरायटी अशी विशेष वैशिष्ट्ये असणार्या या पेढीने ग्राहकांनी ठेवलेल्या विश्वासाला सार्थ ठरवून यशस्वी निरंतर वाटचाल केली आहे. ग्राहकांच्या याच पाठिंब्यामुळे आज छ. संभाजीनगर शहरात चंदुकाका सराफ ज्वेल्स् ची शाखा सुरू होत आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
या विशेष उद्घाटन समारंभ व योजनांचा लाभ समस्त छत्रपती संभाजीनगरकरांनी घेवून दागिने खरेदी सोबतच आपल्या हक्काच्या घराचे स्वप्न साकार करा असे आवाहन संचालक सिद्धार्थ शहा यांनी केले आहे. याशुभप्रसंगी जय किशन शिक्षण संस्था बालिकाश्रमाला आर्थिक मदत प्रदान करण्यात आली.
👉 आपल्या परिसरातील बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क
विजयकुमार कांबळे
मुख्यसंपादक
साप्ताहिक पुंडलिक समाचार , वेब पोर्टल आणि PS न्युज चॅनेल
मोबाईल नंबर -; 8888388139/9004537171
Vijaykumarkamble501@gmail. com
Post a Comment