आराधी,गोंधळी, देवदासी तृतीयपंथीं यांचा फराळासह यथोचित सन्मान
पंढरपूर /प्रतिनिधी
पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मनसेचे अधिकृत उमेदवार दिलीप (बापू) धोत्रे व स्टेशन रोड नवरात्र महोत्सव यांच्या संयुक्त विद्यमाने शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त सन्मान सोहळा गाडगे महाराज मठ पंढरपूर येथे संपन्न झाला.
पुढे बोलताना दिलीप बापू धोत्रे म्हणाले की,
सध्या नवरात्र उत्सव सुरु असल्याने समाज्यातील वंचित, दीनदुबळ्या सर्वसामान्य घटकांचा सर्वांगीण विकास व्हावा व गोंधळी, देवदासी ,तृतीयपंथींचा,आराधी सन्मान करण्यात यावा या उदात्त हेतूने मनसेच्या वतीने सदर कार्यक्रमाचे नियोजन केले व सर्व देवी भक्तांचा फराळ वाटप, साडी चोळीचा आहेर देण्यात आली.याप्रसंगी सुमारे 300 च्या पुढे देवी भक्तांचा सहभाग होता.
पुढे बोलताना ते म्हणाले की,शासनाच्या वतीने विविध प्रकारच्या योजनाचां लाभ करून देणार,आई भवानी चरणी नतमस्तक होऊन मी आपणास शब्द देतो की आपल्या कोणत्याही अडचणी असल्यास मी सोडविण्यासाठी कटीबध्द आहे.आपल मला मतदानरुपी
आशिर्वाद देऊन सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
या कार्यक्रमा वेळी आराधी, गोंधळी देवदासी ,तृतीयपंथीं बहुसंख्येने उपस्थित होते.तसेच हरी बरंगुळे,नाना कदम, शशिकांत पाटील,
दत्तसिंह रजपूत आदी मान्यवंर मंडळी देखील हजर होते.
👉 आपल्या परिसरातील बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क
विजयकुमार कांबळे
मुख्य संपादक
साप्ताहिक पुंडलिक समाचार , वेब पोर्टल आणि PS न्युज चॅनेल
मोबाईल नंबर -; 8888388139/9004537171
Vijaykumarkamble501@gmail. com
Post a Comment