Pundalik Samachar

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क पंढरपूर विभागाची धडक कारवाई, 3 लाख 76 हजार 880 रूपयाचा मुददेमालासह वाहन जप्त.

पंढरपूर /प्रतिनिधी

                                  विधानसभा निवडणूक 2024 पार्श्वभूमीवर आचारसंहिता कालावधीमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागपंढरपूर यांनी केलेल्या धडक कारवाईमध्ये आज वाखरी (ता. पंढरपूर) या ठिकाणी देशी मद्याची अवैध वाहतूक करत असताना चारचाकी वाहनासह मद्यसाठा जप्त करून उमेश हिरालाल चव्हाण रा. भाळवणी याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असल्याची माहिती निरीक्षक पंकज कुंभार यांनी दिली.

           सदर गुन्ह्यात जप्त करण्यात आलेल्या चारचाकी वाहन क्रमांक एम एच 13 एफ के 6037 असून मुद्देमालाची एकूण किंमत 3 लाख 76 हजार 880 रुपये इतकी आहे. सदरची कारवाई पुणे विभागाचे विभागीय उपायुक्त सागर धोमकर याच्या निर्देशानुसार राज्य उत्पादन शुल्क सोलापूर अधीक्षक श्रीमती भाग्यश्री  जाधवउपअधीक्षक एस .आर पाटील याचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. त्याचा पुढील तपास सुरू आहे. 

            सदरची कारवाई निरीक्षक  पंकज कुंभारदुय्यम निरीक्षक श्रद्धा गडदेबापू चव्हाणस. दु. नि. श्री. गुरुदत्त भंडारे जवान श्री. विजय शेळकेप्रकाश सावंतविनायक वाळूजकर व वाहचालक रामचंद्र मदने यांनी पार पाडली.संबंधित गुन्ह्याचा पुढील तपास निरीक्षक  पंकज कुंभार हे करत आहेत.

                    अवैध मद्यविक्री अवैध धंदे व वाहतूकी विरोधात कारवाई या पुढेही चालू राहणार असून अवैध मद्याबाबत माहिती असल्यास टोल फ्री 18002339999 क्रमांक अथवा व्हॉटस ॲप क्रमांक 8422001133  या कार्यालयास माहिती दिल्यास माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल असे निरीक्षक पंकज कुंभार   यांनी सांगुन अवैध मद्याबाबतची माहिती कळविण्याचे आवाहन केले आहे.


👉 आपल्या परिसरातील बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क 

विजयकुमार कांबळे 

संपादक 

साप्ताहिक पुंडलिक समाचार , वेब पोर्टल आणि PS न्युज चॅनेल 

मोबाईल नंबर -; 8888388139/9004537171


Post a Comment

Previous Post Next Post