महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचार शेवटच्या टप्प्याकडे वाटचाल करत असताना पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
मनसे उमेदवार दिलीप धोत्रे यांना मतदार संघातील आजी-माजी नगरसेवक तसेच सर्वच समाजातील नेते मंडळींचा पाठिंबा मिळत असताना आता त्यांना ओबीसी समाज घटक म्हणून ओबीसी प्रवर्गातील सर्वच समाज घटकातील नागरिकांचा पाठिंबा मिळताना दिसत आहे.
रविवारी मनसे उमेदवार दिलीप धोत्रे यांना ओबीसी ब्रिगेड, रजपूत सेवा संघ, विश्वकर्मा पांचाळ सुतार समाज, विश्वकर्माय समाज समन्वय समितीने, सुवर्णकार समाज यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.
यावेळी ओबीसी ब्रिगेडचे साईप्रसाद आढळकर, पांचाळ सुतार समाजाचे सचिन सुतार, चंद्रकांत सुतार, बाळासाहेब सुतार, विश्वकर्मीय समाज समन्वय समितीचे विद्यानंद मानकर, राजपूत सेवा संघाचे किसनसिंग राजपूत, दत्तासिंह राजपूत, जयसिंह मंडवाले, रणजितसिंह परदेशी, रवींद्रसिंह ठाकुर, चैतन्य राजपूत, विजयसिंह राजपूत, संकेतसिंह राजपूत, मनोहर कोतवाल, भारतीय राजपूत, राजश्री मंडवाले, अमरसिंह ठाकूर, राजनसिंह ठाकूर यांच्यासह ओबीसी समाज घटकातील नागरिक उपस्थित होते.
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात मनसे, भाजपा,काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष अशी चौरंगी लढत होत आहे.
निवडणूकी दरम्यान रिंगणात असलेल्या चारही उमेदवारांच्या कामाची तुलना मतदारांकडून केली जात आहे.
यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार दिलीप धोत्रे यांच्या नावाला नागरिकांची पसंती मिळताना दिसत आहे.
आधी केले मग सांगितले या उक्तीप्रमाणे मनसेचे उमेदवार दिलीप धोत्रे यांनी मागील अनेक वर्षांपासून मतदार संघातील नागरिकांचे हित डोळ्यासमोर ठेवून त्यांनी काम केले आहे. पंढरपुरातील नागरिकांचा वाढीव कर माफ करणे, हिंदू, मुस्लिम स्मशानभूमी दुरुस्ती , रस्ते खड्डे मुक्त करणे, शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आर्थिक मदत करणे, बेरोजगार तरुणांना नोकरी उपलब्ध करून देणे, महिलांना सक्षम बनवण्यासाठी लघुउद्योग उभा करून देणे याचबरोबर कोरोना काळात त्यांनी रुग्णांना बेड उपलब्ध करून देण्यासाठी पल्स कोविड हॉस्पिटलची निर्मिती तसेच एकही नागरिक उपाशी झोपणार नाही याची काळजी त्यांनी घेतली होती.त्यामुळे दिलीप बापू धोत्रे यांच्याकडे सर्वसामान्यांना मदत करणारे नेतृत्व म्हणून पाहिले जाते.
सध्या पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघात प्रलंबित असलेले प्रश्न, बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळावे यासाठी लवकरात लवकर उद्योग निर्मिती करणे, महिलांना सक्षम बनवण्यासाठी लघुउद्योग निर्माण करणे, शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळवून देण्याचा मानस दिलीप धोत्रे यांनी व्यक्त केला आहे.
यामुळे सर्वसामान्यांच्या नेतृत्वाला विधानसभेत पाठवण्याचा निर्धार मतदारसंघातील नागरिकांनी केला आहे.
👉 आपल्या परिसरातील बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क
विजयकुमार कांबळे
संपादक
साप्ताहिक पुंडलिक समाचार , वेब पोर्टल आणि PS न्युज चॅनेल
मोबाईल नंबर -; 8888388139/9004537171
Vijaykumarkamble501@gmail. com
Post a Comment