Pundalik Samachar

माढ्याच्या विकासाचे व्हीजन असणाऱ्या अभिजित पाटील यांना मतदारांची साथ


पंढरपूर /प्रतिनिधी 

माढा विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अभिजीत पाटील यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी परीते,अकोले बु आहेरगाव, भुईंज, पालवन, अंकुबी, भटुंबरे, नारायण चिंचोली, ईश्वर वठार या ठिकाणी सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षाचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना अभिजीत पाटील म्हणाले की, ही निवडणूक कारखान्याची नसून विधानसभेची आहे. विद्यमान आमदारांनी ऊस आणि पाण्यावरच राजकारण केले. यामुळे तब्बल सहा वेळा प्रतिनिधित्व करूनही तीस वर्षात कोणतीही विकास कामे झाली नाही असा आरोप करत त्यांनी मतदारसंघातील रस्त्याची दुरावस्था झाली आहे. बसस्थानकाची दुरावस्था झाली आहे. दर्जेदार आरोग्य सेवा नाही. उच्च शिक्षणाची सोय नाही. बेरोजगारी वाढली आहे. नोकरीसाठी येथील तरुणांना बाहेरगावी जावी लागत आहे. असा सवाल उपस्थित करत त्यांनी माढ्याच्या विकासाचे व्हिजन नागरिकांसमोर मांडले. 

याप्रसंगी राष्ट्रवादीच्या मीनल साठे गटाचे जाधववाडी विविध सोसायटीचे चेअरमन शिवाजी भाकरे, शिवाजीराजे कांबळे गटाचे संतोष वामन मुटकुळे, राजाभाऊ सलगर व तसेच सोलंकरवाडीचे सरपंच बाबासाहेब पांढरे, यांनी अभिजीत पाटील यांच्या कार्यावर व कर्तुत्वावर विश्वास ठेवत येणाऱ्या काळामध्ये साथ देण्यासाठी विजय करण्यासाठी साथ देण्याची ठरवले आहे. त्यामुळे आम्ही अभिजीत पाटील यांची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली असल्याचे दिसत आहे.

यावेळी अनेक वक्त्यांनी बोलताना सांगितले की, माढ्याच्या विकासाचे व्हिजन डोळ्यासमोर ठेवून काम करणारे अभिजीत पाटील यांना मतदार संघाच्या सर्वांगीण विकास करण्यासाठी आपला मतदानरुपी आशीर्वाद देऊन विधानसभेत पाठवले पाहिजे असा निर्धार करण्यात आला.
कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना सर्वसामान्य कुटुंबातील युवक पुढे येऊन श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची धुरा यशस्वीपणे सांभाळताना आता मतदारांनीच अभिजीत पाटलांना आमदार करावासे वाटत आहे. माढ्याचे विकासाचे व्हिजन डोळ्यासमोर ठेवून तीस वर्षात न केलेला विकास तो पाच वर्षात भरून काढण्याची धमक अभिजीत पाटलांमध्ये दिसत असल्यामुळे नागरिकांचा कौल हा अभिजीत पाटलांच्या मागे सरताना दिसत आहे.

👉 आपल्या परिसरातील बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क 
विजयकुमार कांबळे 
मुख्य संपादक 
साप्ताहिक पुंडलिक समाचार , वेब पोर्टल आणि PS न्युज चॅनेल 
मोबाईल नंबर -; 8888388139/9004537171

Post a Comment

Previous Post Next Post