Pundalik Samachar

उन्हाळ्यात वाड्या वस्त्यांपर्यंत पाणी पोहचवा; आ. आवताडे पाणी प्रश्नावर आमदार समाधान आवताडे यांच्या अधिकाऱ्यांना सूचना...

पंढरपूर /प्रतिनिधी

पंढरपूर तालुक्यातील नागरिकांना उन्हाळ्यात पाणी  टंचाईचा सामना करावा लागू नये यासाठी पंढरपूर पंचायत समिती सभागृहात आ. समाधान आवताडे यांनी बुधवारी पंढरपूर तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक व सर्व विभागाच्या  अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पाणी टंचाई आढावा बैठक घेतली. 

याप्रसंगी उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, गटविकास अधिकारी सुशील संसारे, नायब तहसीलदार बालाजी पूदलवाड यांच्यासह सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
 
या आढावा बैठकीत अनेक सरपंच व सदस्यांनी पाणी टंचाईदूर करण्यासाठी गावागावातील ओढे,नाले, तलाव  हे नीरा उजवा व उजनी मधून भरून घ्यावेत. पाणी मिळत नसूनही कर आकारणी केली जाते अशा तक्रारींचा पाढा लोकप्रतिनिधीसमोर वाचला.

नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये यासाठी आमदार समाधान आवताडे यांनी गावागावातील   ओढे,नाले, तलाव भरून घ्यावेत. हातपंप सुरू करून वाड्या वस्त्यांपर्यंत पाणी पोहोचवा अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी घरकुल योजना यासह विविध विभागाचा आढावा घेतला.
या आढावा बैठकीमुळे योग्य पाण्याचे नियोजन होणार असून नागरिकांना दिलासा मिळणार आहे. 


आपल्या परिसरातील बातम्या तसेच जाहीराती साठी संपर्क

विजयकुमार कांबळे

संपादक

सा. पुंडलिक समाचार,वेब पोर्टल व PS न्युज चॅनेल

मो-; 8888388139/9004537171

Vijaykumarkamble501@gmail. com

Post a Comment

Previous Post Next Post