पंढरपूर /प्रतिनिधि
अधिकमास दि.18/07/2023 ते दि.16/08/2023 या कालावधीत संपन्न झाला. या कालावधीत भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती. त्यांना मंदिर समितीकडून पुरेसा प्रमाणात सोई सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. या अधिकमासात मंदिर समितीस विविध माध्यमांतून रक्कम रू.7,19,43,037/- इतके उत्पन्न मिळालेले आहे. सन 2018 मध्ये रू.2,32,51,924/- इतके उत्पन्न मिळाले होते. सन 2018 च्या तुलनेने यावर्षीच्या अधिकमासाच्या उत्पन्नात रू.4,86,91,113/- इतकी वाढ झाली असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.
तसेच या कालावधीत 6,39,917 भाविकांनी पदस्पर्शदर्शन व सुमारे 5,00,000 भाविकांनी मुखदर्शनाचा लाभ घेतला आहे. श्रींच्या चरणाजवळ, नित्यपुजा, लाडूप्रसाद, अन्नछत्र, देणगी, महानैवेद्य, भक्तनिवास, तुळशीपूजा, मोबाईल लॉकर इत्यादी माध्यमांतून सदरचे उत्प्नन मिळालेले आहे.
अधिकमासात सोने-चांदीच्या वस्तू दान करण्याची प्रथा असून, रक्कम रू.24,98,890/- किंमतीचे सोने व रू.8,18,859/- किंमतीचे चांदीच्या वस्तू भाविकांकडून प्राप्त झालेल्या आहेत. या सर्व प्राप्त देणगीतून भाविकांना अत्याधुनिक व पुरेसा प्रमाणात सोई सुविधा देण्याचा प्रयत्न मंदिर समितीचा राहणार असल्याचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगीतले.
आपल्या परिसरातील बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क
विजयकुमार कांबळे
संपादक
मो.नो-; 8888388139/9004537171
Vijaykumarkamble501@gmail.com
إرسال تعليق