सोलापूर/प्रतिनिधि
राज्याचे लोकप्रिय तथा संवेदलशील मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे व राज्याचे आरोग्यदूत आरोग्यमंत्री प्रा.तानाजीराव सावंत यांनी राज्यातील जनतेच्या आरोग्याकरिता वेगवेगळ्या शिबिरातून शासनाच्या व शिवसेना पक्षाच्या माध्यमातून सातत्याने जनतेचे आरोग्य जपण्यासाठी उपाययोजना राबवित आहेत.
त्याचाच एक भाग म्हणून शिवसेना सोलापूर संपर्क प्रमुख आरोग्यरक्षक प्रा. शिवाजीराव सावंत यांच्या नेतृत्वात युवासेनेच्या तर्फे आरोग्य शिबिराचे आयोजन युवासेना जिल्हाप्रमुख सागर शितोळे यांनी ड्रीम पॅलेस पोलीस कल्याण केंद्र ,रामलाल चौक येथे आयोजित केले होते.या शिबीराचे उदघाटन शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रा शिवाजीराव सावंत,प्रदेश प्रवक्त्या प्रा डॉ ज्योती वाघमारे,जिल्हाप्रमुख अमोल शिंदे,उपजिल्हाप्रमुख हरिभाऊ चौगुले,शहर प्रमुख मनोज शेजवाल,जिल्हाप्रमुख महावीर देशमुख,शहर समनव्यक दिलीप कोल्हे,युवासेना जिल्हाप्रमुख उमेश गायकवाड,प्रियदर्शन साठे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संतोष नवले,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धनंजय पाटील,सोलापूर महानगरपालिका आरोग्यअधिकारी डॉ.बसवराज लोहारे,डॉ.मोहन शेंगर, डॉ. श्रीकांत कुलकर्णी, डॉ.अतिश बोराडे, डॉ.गणेश इंदूरकर,महिला शहरप्रमुख जयश्रीताई पवार,दत्तात्रय सावंत,भारतीय जनता पार्टी चे युवा नेते तथा सदर शिबीर घेण्यासाठी सहकार्य करणारे नागेश खरात, गणेश नरोटे,अजय राणा यादव,नारायण मडीवाळ,अक्षय सुर्यवंशी, वैभव बिराजदार, रोहित खताळ, बसू कोळी,राजकुमार शिंदे,समर्थ मोटे,शशी शिंदे,शिवाजी नीळ,ब्रह्मदेव गायकवाड,सायबांना तंगेळी,शशिकांत कट्टीमनी,किशोर चव्हाण, शिवराज विभूते, ज्योतिबा गुंड,पद्मसिंह शिंदे, येशू मड्री, लकी कोंका,हिवरकर,कॉलेज कक्ष जिल्हाप्रमुख सुजीत खुर्द,जवाहर जाजू,मानिशाताई नलावडे,सुनंदाताई साळुंके,अनिता गवळी,संगीता कणबसकर,निहाल शिवसिंगवले यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले.
या महाआरोग्य शिबीरात कान नाक,घसा,त्वचा रोग,हृदयाची तपासणी,ईसीजी,ब्लड प्रेशर तपासणी ,नेत्र तपासणी ,मेन्दुच्या विविध तपासण्या करण्यात आल्या, या शिबीराचा लाभ पाटील चाळ, जुनी मिल चाळ, नरसिंग चाळ, वारद चाळ, बुबने चाळ, रामलाल चौक, भैय्या चौक, कडादि चाळ, फॉरेस्ट, कोणापुरे चाळ व आदी शहरातील मध्यमवर्गीय लोकवस्ती असलेल्या भागातील लोकांनी घेतला.
शिबीर यशस्वी करण्यासाठी बुबने चाळ नवरात्र मोहोत्सव तरुण मंडळ,नवसाचा गणपती तरुण मंडळ बुबने चाळ, डॉ. द्वारकानाथ कोटणीस मेडिकल व सोशल फौंडेशन च्या वतीने परिश्रम घेतले.
आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क
विजयकुमार कांबळे
संपादक
मो.नो-; 8888388139/9004537171
मेल आयडी -; vijaykumarkamble501@gmail.com
إرسال تعليق