Pundalik Samachar

नवतंत्रज्ञानाचा वापर करुन नागरिकांना सुविधा देण्यात महसूल प्रशासन आघाडीवर - प्रांताधिकारी गजानन गुरव





पंढरपूर (दि.01):- महसूल प्रशासनातील प्रत्येक घटकाकडून सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्यावर भर दिला जात आहे. नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ देऊन त्यांचे जीववनमान उंचावण्याचे काम महसूल विभाग करीत असतो. या विभागाने सर्वसामान्य नागरिकांना अधिक गतीने सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी नवतंत्रज्ञानाचा वापर करुन काम अधिक प्रभाविपणे केले असल्याचे प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी सांगितले.

महसूल दिनाचे औचित्य साधून महसूल विभागात विविध संवर्गात चांगले काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी यांचा गौरव सांस्कृतिक भवन, प्रांत कार्यालय पंढरपूर येथे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी अधिकारी कर्मचारी यांचा मानचिन्ह, प्रशस्तीपत्र पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी प्रांताधिकारी गजानन गुरव, तहसीलदार सुशील बेल्हेकर, अपर तहसीलदार तुषार शिंदे, मुख्याधिकारी अरविंद माळी, नाही तशिलदार मनोज श्रोत्री, आप्पासाहेब तोंडसे, पंडित कोळी वैभव बुचके तसेच पुरवठा नायब तहसीलदार शितल कन्हेरे यांच्यासह महसूल अधिकारी कर्मचारी, मंडळ अधिकारी, तलाठी, कोतवाल उपस्थित होते.






नवीन तंत्रज्ञानाने सर्व कामे सुलभ आणि वेळेत, पारदर्शक पध्दतीने होतात. यामध्ये ऑनलाईन 7/12 , ई फेरफार नोंदी, ई-हक्क प्रणालीत नागरिक स्वता: फेरुारची नोंद करु शकतात. Equij court प्रणालीचा वापर करुन नागरिक महसूल प्रशासनाकडे सुरु असलेले दावे याबाबत माहिती घेवू शकतात. ही कामे करीत असताना संवेदनशीलता ठेवणे महत्वाचे आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये मदत मिळवून देणे तसेच 132 प्रकारच्या शासकीय अंमलबजावणी करण्याबरोबरच शासकीय महसूल गोळा करण्याचे काम महसूल विभाग पार पाडत असल्याचे प्रांताधिकारी गुरव यांनी यावेळी सांगितले


महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना प्रोत्साहन देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन सर्व महसुली यंत्रणेमार्फत केले जाते. महसूल विभागातील सर्वच अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपल्या कामातून आपली ओळख निर्माण करावी. आपल्याकडे आलेला प्रत्येक नागरिकाच्या कामाचा निपटारा तात्काळ करावा. तसेच त्यांना आवश्यक असलेले मार्गदर्शन व सहकार्य करण्याचा प्रयत्न करावा. कर्मचारी व अधिकार यांनी काम करीत असताना जबाबदारीला प्राधान्य देऊन काम करावे असे तहसीलदार सुशिल बेल्हेकर यांनी यावेळी सांगितले.

यावेळी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. नायब तहसीलदार मनोज श्रोत्री, अव्वल कारकून महेश जाधव, मंडळ अधिकारी रवी शिंदे, महसूल सहाय्यक सुरेश कदम, तलाठी निलेश कुंभार, शिपाई भाऊ शिंदे तसेच कोतवाल नागनाथ चव्हाण त्याचबरोबर पंढरपूर उपविभागीय अधिकारी कार्यालयातील लिपिक सारिका जाधव यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

Post a Comment

أحدث أقدم