पंढरपूर तालुका केमिस्ट परिवाराच्या वतीने भव्य सत्कार
पंढरपूर /प्रतिनिधि
पंढरपूर तालुका केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत खलिपे यांची महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन च्या पश्चिम महाराष्ट्र खजिनदार पदी निवड करण्यात आली असून तसेच त्यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर तालुका केमिस्ट परिवार यांच्या वतीने भव्य सत्कार नुकताच करण्यात आला. यावेळी क्रेनच्या सहाय्याने मोठा हार घालून डॉ.सादिक शेख यांच्यावतीने प्रशांत खलिपे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी पंढरपूर तालुका केमिस्ट आसोसिएश चे जेष्ठ मागर्दशक सतिश आण्णा सादिगले, श्रीरंग बागल, गोवर्धन भट्टड, सुदेश व्होरा, किशोर निकते, कुलभूषण गांधी यांच्या हस्ते देखील सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी पंढरपूर तालुका केमिस्ट असोसिएशनचे सर्व पदाधिकारी व केमिस्ट महिला भगिनी,बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदरच्या निवडीनंतर प्रशांत खलिपे यांचे पंढरपूरसह राज्यातील अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले.
आपल्या परिसरातील बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क
संपादक
विजयकुमार कांबळे
mo. no-; 8888388139/ 9004537171
मेल आयडी-; vijaykumarkamble501@gmail.com
إرسال تعليق