भंडीशेगांव /प्रतिनिधि
भंडीशेगांव येथे रक्षाबंधनाच्या निमित्ताने पंढरपूर रोटरी क्लब व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण च्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता,कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंढरपूर येथील अस्थिरोग तज्ञ डॉ.वैभव सादगीले हे उपस्थित होते.
रोटरी क्लब च्या माध्यमातून सातत्याने वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबविले जातात,गरीब व होतकरू हुशार विध्यार्थी दत्तक घेणे,शैक्षणिक साहित्य गरीब विद्यार्थ्यांसाठी भेट देणे,अशाप्रकारचे अनेक उपक्रम रोटरी क्लब च्या वतीने राबविण्यात येत असतात त्याचाच एक भाग म्हणून भंडीशेगांव येथे वृक्षारोपण करण्यात येत असल्याचे रोटरी क्लबच्या ट्रेझरर डॉ.संगीता पाटील यांनी सांगितले.
भंडीशेगांव येथे विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी गावच्या सरपंच मनीषा येलमार यांच्या वाढदिवसानिमित्त रोटरी क्लब च्या सर्व सदस्य चे स्वागत करून सत्कार करण्यात आला, तसेच सरपंच मनीषा येलमार यांना वाढदिवसाच्या निमित्ताने रोटरी क्लब कडून एक वृक्ष भेट देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी रोटरी क्लब ची माहिती रनर्स असोसिएशनचे अध्यक्ष भारत ढोबळे यांनी दिली.
महेंद्र येलपले यांच्या घरापासून ते रमेश शेगावकर यांच्या घरापर्यंत लवकरच लोकसभागातून फळांची झाडे लावली जाणार असल्याची माहिती सरपंच मनीषा येलमार यांनी दिली.
वृक्षारोपण कार्यक्रमास रोटरी क्लब चे अध्यक्ष आनंद गोसावी,रोटरी क्लब प्रकल्प प्रमुख किशोर सोमाणी,पंचायत समिती सदस्य पल्लवी येलमार,डॉ.वैभव सादगीले,डॉ.संगीता पाटील,भारत ढोबळे,भाजपा वैद्यकीय सेलचे अध्यक्ष डॉ.श्रीधर येलमार,ग्रामपंचायत सदस्य प्रियांका ननवरे,शारदा जाधव,सुमन येलमार,ग्रामसेवक जी.बी.नरसाळे,साधना गिड्डे,ईश्वर सुरवसे,संतोष भोसले,गणेश पाटील,ज्ञानेश्वर गिड्डे,सतीश रणखांबे,सोमनाथ विभूते,संदीप ननवरे आदी उपस्थित होते
आपल्या परिसरातील बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क
विजयकुमार कांबळे
संपादक
साप्ताहिक पुंडलिक समाचार, वेब पोर्टल
मो.नो-; 8888388139/9004537171
Mail id-; vijaykumarkamble501@gmail. com
إرسال تعليق