Pundalik Samachar

पंढरपूर येथील तृतीय पंथीयाना रेशन कार्डचे वाटप





शासकीय लाभासाठी होणार ओळखपत्राचा उपयोग



पंढरपूर (दि.03):- महसूल विभागाच्या वतीने 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट महसूल सप्ताह साजरा होत आहे. या अनुषंगाने पंढरपूर तालुक्यातील तृतीय पंथीयांना विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र त्याचबरोबर आधार कार्ड देखील देण्याचा उपक्रम महसूल सप्ताह निमित्त तहसिलदार सुशिल बेल्हेकर यांच्या हस्ते करण्यात आला.

तहसील कार्यालय येथील रायगड भवन येथे तृतीय पंथीयांना विविध शासकीय दाखे, ओळखपत्र वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तहसीलदार सुशिल बेल्हेकर , निवडणुक नायब तहसीलदार वैभव बुचके पुरवठा निरीक्षण अधिकारी शितल कन्हेरे, पुरवठा. निरीक्षक सदानंद नाईक, मंडळाधिकारी पंढरपूर विजय शिवशरण, तलाठी पंढरपूर राजेंद्र वाघमारे, अनिता जाधव यांच्यासह तहसील कार्यालयातील अधिकारी- कर्मचारी तसेच तृतीयपंथीय उपस्थित होते.

ओळखपत्रांचा वापर तृतीयपंथींना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी होणार आहे. विविध विभागाच्या योजनांमुळे तृतीयपंथी समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यास मदत होणार आहे. सामाजिक दृष्ट्या उपेक्षित राहिलेल्या तृतीपंथीयांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी महसूल प्रशासनाने राबविलेल्या हा उपक्रम स्तुत्य ठरत असल्याचे तहसिलदार सुशिल बेल्हेकर यांनी सांगितले.

यावेळी तृतीय पंथीयांना आधारकार्ड दुरुस्ती करून देण्यात आली. शासनाकडून देण्यात येत असलेल्या संजय गांधी निराधार योजनेमध्ये नावे समाविष्ट करण्यात आली. त्याबाबतचे तत्काळ मंजूरीचे पत्र त्यांना देण्यात आल्याने दरमहा दीड हजार रूपये मानधन मिळणार आहे. तसेच त्यांचे नावे रेशन कार्ड काढण्यात आल्याने त्यांना अन्नसुरक्षा योजनेत दरमहा धान्य मिळणार आहे. व महात्मा फुले जन आरोग्य योजनेतर्गंत रुग्णालयात मोफत उपचाराचा घेण्याचा लाभ घेता येणार आहे. तसेच ज्यांचे नाव मतदार यादीत नाही अशा लोकांचे मतदार यादीत नाव घेण्यासाठी फॉर्म भरून घेण्यात आल्याचे तहसिलदार बेल्हेकर यांनी सांगितले.

पारधी समाजातील नागरिकांना दाखल्याचे वितरण

महसूल सप्ताह पंढरपूर तालुक्यातील दुर्गम अशा मौजे जलोळी गावाला भेट देऊन तेथील पारधी समाजातील बांधवांना विविध दाखले वितरित करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने जातीचे दाखल, उत्पन्नाचे दाखले आदी विविध दाखल्यांचे वाटप तहसिलदार सुशील बेल्हेकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी अप्पर तहसीलदार तुषार शिंदे, मंडळ अधिकारी चंद्रकांत ढवळे, तलाठी निलेश कुंभार, के एम शिंदे उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم