पंढरपूर/प्रतिनिधि
आपटे उपलप प्रशालेत दरवर्षी प्रमाणे यावर्षीही इयत्ता ५ वी मध्ये शिकत असलेल्या १५० विद्यार्थ्यांना प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षिका यांचे वतीने १५ ऑगष्टच्या आधी म्हणजे आज 14 तारखेच्या पूर्वसंध्येला शालेय गणवेश देण्यात आले.
उत्कृष्ट निकालाची परंपरा ,शिस्त,विविध शालेय स्पर्धा ,परीक्षा, यासह इतर स्पोर्ट्स मध्ये आपले नांव आणि दबदबा निर्माण करणारी शाळा अशी तालुक्यात ओळख आहे.यशाची परंपरा ,गुणवत्ता कायम राखण्यात जसे विद्यार्थी, विध्यार्थीनी पुढे असतात तसेच त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असणारे शिक्षक ही तितकेच महत्वाचे असते.
यावेळी मुख्याध्यापक जयंत हरिदास, पर्यवेक्षक दत्तात्रेय धारुरकर, ज्येष्ठ शिक्षक अनिल अभंगराव, बंडू गुलाखे व नरेंद्र डांगे, आबा खरात, संतोष करकमकर, सौ सर्वगोड, सौ सविता आगावणे, कु विजया टेके आदींच्या हस्ते प्रशालेत गणवेश वाटण्यात आले.
आपल्या परिसरातील बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क
संपादक
विजयकुमार कांबळे
मो .नो -; 8888388139/9004537171
Vijaykumarkamble501@gmail.com
إرسال تعليق