Pundalik Samachar

पंढरपूर - मंगळवेढा भागात चारा डेपो आणि पाण्याची व्यवस्था करा ---: अभिजित पाटील


पंढरपूर/प्रतिनिधी

सध्या सोलापूर जिल्ह्यातील पाऊसकाळ न झाल्यामुळे दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाच्या कमतरतेमुळे सर्वत्र बिकट अवस्था झाल्याने जनावरांचा चारा आणि पिण्याचे पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. दि.३०ऑगस्ट रोजी मुंबई येथे श्री विठ्ठल सह.साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांना भेटून निवेदन दिले.

तसेच पाण्यामुळे पिके करपू लागली आहेत. भिमा नदी पात्र कोरडे असुन नदी व कॅनोलला पाणी सोडावे याबाबत ही चेअरमन अभिजीत पाटील यांनी सविस्तर चर्चा केली. येत्या दोन दिवसांत बैठक लावण्याचे आदेश पालकमंत्री महोदयांनी दिले असून सकारात्मक विचार होईल असा विश्वास व्यक्त केला.

कठीण परिस्थितीत शेतकरी बांधवांच्या आम्ही पाठीशी आहोत. चाऱ्याअभावी या मुक्या जनावरांचे होणारे हाल थांबविण्यासाठी प्रयत्न करीन आहोत असे अभिजीत पाटील यांनी बोलताना सांगितले.

आपल्या भागातील बातम्या आणि जाहीरातीसाठी संपर्क
विजयकुमार कांबळे
संपादक
साप्ताहिक पुंडलिक समाचार व वेब पोर्टल
मो.नो ------8888388139/9004537171
Mail---- vijaykumarkamble501@gmail. com

Post a Comment

أحدث أقدم