पंढरीत पांडुरंग (तात्या) माने फाऊंडेशनकडून तृतीयपंथीयांना साडी वाटप आणि अनेक सामाजिक उपक्रम
पंढरपुर /प्रतिनिधी
सामाजिक संस्था आणि संघटनांच्या विविध स्तुत्य उपक्रमाबाबत आपण ऐकलं असेल अनेक सामाजिक संस्था आणि संघटना आपल्या अभिनव सामाजिक उपक्रमामुळे समाजाचं लक्ष वेधून घेत असतात. पंढरीतही अनेक सामाजिक संस्था व संघटना कार्यरत आहेत. अशाच पांडुरंग (तात्या) माने फाऊंडेशन या सामाजिक संस्थेने गेल्या पाच वर्षांपासून अनेक वेगवेगळ्या उपक्रमाद्वारे आपला वेगळा ठसा सामाजिक क्षेत्रात उमटवलाय. ही संस्था स्थापन करणारा तरुण निलेश पांडुरंग माने याने आपले वडील कै.पांडुरंगतात्या माने यांच्या सहाव्या स्मृतीदिनानिमित्त पंढरीतील तृतीयपंथियांना सन्मानाने बोलाऊन त्यांचा यथोचित सत्कार करत त्यांना आपल्या मातोश्री सुरेखाताई माने यांच्या शुभहस्ते साडी, श्रीफळ, टॉवेल टोपी असा संपुर्ण कपड्यांचा आहेर केलाय.
सोलापूर जिल्ह्यात सर्वप्रथमच तृतीयपंथियांचा अशा प्रकारे सन्मान करण्यात आलाय. यावेळी उपस्थित तृतीय पंथियांनी आपले मनोगत व्यक्त करताना गहिवरल्या कंठाने निलेश माने व त्यांच्या मातोश्रींनी दिलेल्या या सन्मानाबद्दल आभार व्यक्त करताना त्यांना भरभरुन आशिर्वाद देत पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. आज या सामाजिक उपक्रमासोबतच संस्थेच्या वतीने वृक्षारोपन करण्यात आले. तसेच मातोश्री सखुबाई कन्या प्रशालेतील विद्यार्थिनींना सुग्रास भोजन दिले. यावेळी मातोश्री सुरेखाताई माने, निलेश माने, गणेश माने, दिनेश माने, उमेश जाधव, तेजस अभंग, नागेश मिसाळ यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
कै.पांडुरंगतात्या माने या संस्थेची स्थापना केली, संस्था धर्मादाय आयुक्तांकडे रजिस्टर केली. ही सामाजिक संस्था सुरु करतानाच समाजातील वंचित, शोषीत, निराश्रीत लोकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी चौफेर प्रयत्न करणे आणि त्यांचे जीवनमान उंचावणे हे होते. त्यानुसार आजतागायत पंढरीतील चंद्रभागा नदी परिसर, घाट, प्रदक्षिणा मार्ग व शहराच्या विविध भागातील निराश्रीत बेवारस व्यक्तींना अन्न, वस्त्र पुरवत त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याचं कार्य संस्थेनं केलंय. याचसोबत शहरातील अंधशाळा, वृध्दाश्रम, अंगणवाडी आदी ठिकाणीही आवश्यक ते सहकार्य केलेले आहे. काळाच्या ओघात नष्ट होत चाललेली वार्ताफलक संस्कृती पंढरीत पुन्हा नव्याने सुरु करत पंढरीतील अनिल नगरमध्ये वार्ताफलक उभारुन त्यावर दररोज विविध सुविचार, महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथींची माहिती आदी ठळकपणे प्रसिध्द केली जातात, कोरोना काळातील लॉकडाऊन सुरु झाल्यापासुन ते संपेपर्यंत अविरतपणे कोरोना योध्दयांना चहा, सरबत, नाष्टा दररोज पुरवण्यात आला, विशेष म्हणजे यामध्ये दररोज वेगवेगळ्या पदार्थांचा समावेश असे, सोबत काढा आणि विविध फळांचा रस यांचा समावेश केला. अशी माहिती यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश माने यांनी दिली.
आपल्या परिसरातील बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क
विजयकुमार कांबळे
संपादक
साप्ताहिक पुंडलिक समाचार , वेब पोर्टल आणि PS न्युज चॅनेल
मोबाईल नंबर -; 8888388139/9004537171
Vijaykumarkamble501@gmail.com
إرسال تعليق