पंढरपूर/प्रतिनिधि
पंढरपूर येथील नेत्ररोग तज्ञ डॉ.मनोज भायगुडे यांची जम्मू-काश्मीर येथे केंद्र सरकार व राज्य सरकारच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिरासाठी निवड करण्यात आली आहे.त्याबद्दल त्यांचा सत्कार डॉ.श्रीधर येलमार व डॉ.श्रद्धा विक्रम कदम यांनी केला.
पंढरपूर येथील नेत्ररोग तज्ञ डॉ.मनोज भायगुडे यांनी मागील दहा वर्षांपासून विविध ठिकाणी जाऊन मोफत आरोग्य शिबीर घेतली असून हजारो रुग्णावर मोफत उपचार केले आहेत, त्यांच्या कार्याची दखल घेऊन केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने डॉ.मनोज भायगुडे यांना जम्मू काश्मीरमधील आरोग्य शिबिरासाठी निमंत्रित केले आहे. महाराष्ट्र राज्यातून एकूण तीन नेत्ररोग तज्ञ ची निवड झाली असून यामध्ये डॉ.मनोज भायगुडे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार भाजप वैद्यकीय सेल चे अध्यक्ष डॉ.श्रीधर येलमार व श्रद्धा विक्रम कदम यांच्या हस्ते करण्यात आला.
केंद्र सरकारच्या मार्गदर्शनाखाली जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे दहा दिवसाचे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, या शिबिरात राज्यातील विविध भागांतील डोळ्यांच्या तक्रारी असलेल्या हजारो रुग्णावर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती डॉ.मनोज भायगुडे यांनी दिली.
यावेळी निवेदिका रेखा चंद्रराव,डॉ.श्रीधर येलमार,डॉ.श्रद्धा विक्रम कदम,दीपाली सतपाल आदी उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क
विजयकुमार कांबळे
संपादक
साप्ताहिक पुंडलिक समाचार व वेब पोर्टल
मो. नंबर -; 8888388139/9004537171
Vijaykumarkamble501@gmail.com
إرسال تعليق