Pundalik Samachar

विकासाचा नवा पॅटर्न घेऊन मोहोळच्या जनतेसाठी काम करणार -- : मा. आमदार रमेश कदम


मतदारांचा कौल मिळाल्यास आमदारकी पुन्हा लढवणारच.....

मोहोळ/ प्रतिनिधी

गेल्या आठ वर्षे जेल मध्ये होतो.जेलमधून सुटल्यानंतर अनेक पक्षाच्या नेते मंडळीनी त्यांच्या पक्षांमध्ये येण्याची विनंती केली परंतु तसा मी कोणालाही शब्द दिला नाही.मोहोळ मतदार संघात जावून जनतेशी संवाद साधून मग मतदार  काय सांगतील तो निर्णय घेणार असल्याचे प्रतिपादन मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांनी मोहोळ येथे नागरी सत्कार प्रसंगी बोलताना म्हणाले.

मोहोळचे माजी आमदार रमेश कदम जेल मधून सुटल्यानंतर पहिल्यादाच मोहोळ शहरात त्यांचे जंगी स्वागत झाले त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मोहोळ शहरात मनसे, जय महाराष्ट्र प्रतिष्ठान,शरद पवार गटांनी डिजीटल बोर्ड लावून स्वागत केले.तसे कदम यांच्या नागरी सत्काराचे आयोजन मोहोळ नगरपरिषदेसमोर त्याच्या समर्थकांनी केले होते. 

याप्रसंगी या कार्यक्रमाची सुरुवात " मागेल त्याला पाणी " या गीत गायनाने करण्यात आली. पाऊस चालू असताना नागरीक बहुसंख्येने उभ्या पावसात माजी आमदार रमेश कदम यांची वाटत पाहत उभे होते. या कार्यक्रमाची प्रस्तावना लहुजी शक्ती सेनेचे जिल्हा अध्यक्ष वसंत देडे यांनी केली नंतर मा .आमदार रमेश कदम यांचा  नागरी सत्कार करण्यात आला.मनसेचे तालुका अध्यक्ष ॲड कैलास खडके, ॲड हिदूराव देशमुख,शहर प्रमुख शाहूराजे देशमुख,आप्पा पवार,दिनेश घागरे, आदीसह प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

या ८ वर्षांमध्ये राजकारणाची परिस्थिती बदलली आहे. स्वार्थासाठी कोण कुठल्याही पक्षात जाऊन घरोबा निर्माण करत आहे. माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला भ्रष्टाचाराच्या खोट्या गुन्हयात अडकवण्यात आले. मोहोळ मतदार संघात येण्याअगोदर मला काही जण म्हणाले की आता ८ वर्ष झालीत तुम्हाला त्या मतदार संघात कोण विचारणार ? परंतु मी त्यांना सांगीतले मोहोळ मतदार संघातील मतदार प्रामाणीक आहेत केलेल्या कामाची जाणीव ठेवणारी लोक आहेत. ते तसे करणार नाहीत आणी तुम्ही शब्द खरा करून दाखवलात हे  आजच्या तुमच्या गर्दीवरून दिसत आहे. काहींनी माझ्या बद्दल अफवा पसरवल्या हा काय परत येणार नाही मागच्या वेळेसारखा परत दोन तीन दिवस थांबेल.
 आणी परत जेलमध्ये जाईल परंतु मला कोर्टाने कायमचा जामीन दिला आहे असे माजी आमदार रमेश कदम म्हणाले.  

ते पुढे बोलताना ते म्हणाले की, पुढील काळात दहा पंधरा दिवसातून मतदार संघात दौरा करून घराघरापर्यंत जाणार आणि सामान्य माणसाच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार. विकासाचा नवा पॅटर्न तयार करण्यात आला असून नवे रस्ते निर्माण करणार असल्याचे ही त्यांनी सांगितले. येथील लोकप्रतिनिधीही प्रामाणिकपणे काम करत असून त्याना सहकार्य करणार मतदारांची इच्छा असेल तर परत निवडणूक लढवणार असल्याचे त्यानी सांगीतले या आपल्या लाडक्या मोहोळच्या माजी आमदार रमेश कदम यांना बघण्यासाठी तोबा नागरीकांनी गर्दी केली होती.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शशी कसबे,विठ्ठल सरवदे,राम कांबळे,संजय वाघमारे,संजय कसबे,कृष्णा जाधव,सचिन भिसे,सुधीर खंदारे,जयपाल पवार,अभिमान कांबळे, नागेश खिलारे ,राजाभाऊ अष्टूळ भैया काळे, आदींनी परिश्रम घेतले.

आपल्या परिसरातील बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क 
विजयकुमार कांबळे 
संपादक 
साप्ताहिक पुंडलिक समाचार , वेब पोर्टल आणि PS NEWS चॅनेल
मोबाईल नंबर -; 8888388139/9004537171
Vijaykumarkamble501@gmail.com

Post a Comment

أحدث أقدم