पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे विकासरत्न आमदार समाधान आवताडे यांच्या ४७ व्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघांमध्ये विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे. सदर कार्यक्रमांमध्ये मंगळवार, दिनांक २१ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ०९ ते सायं.५ पर्यंत आमदार जनसंपर्क कार्यालय मंगळवेढा येथे रक्तदान शिबीर संपन्न होणार आहे.
त्याचबरोबर २१ नोव्हेंबर पासून प्रत्येक गावोगावी पशुसंवर्धन विभाग व खाजगी पशुचिकित्सक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत पशु आरोग्य तपासणी व औषधोपचार हे पशु शिबीर संपन्न होणार आहे. या शिबीरामध्ये लाळ-खुरकत लस, मिनरल मिक्सर, जनता गोचीड नाशिक औषधे या आजारांवर मोफत उपचार उपलब्ध होणार आहेत. शनिवार दिनांक २५ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ०९ ते सायं.५ पर्यंत मोफत नेत्र तपासणी शिबिर अंतर्गत मोतीबिंदू तपासणी शस्त्रक्रिया व गरजूंना चष्मे वाटप होणार आहे. या शिबीरामध्ये डॉ.गणेश इंदुरकर, डॉ.निखिल तोष्णीवाल, डॉ.मनोज भायगुडे, डॉ.दौला ठेंगील, डॉ.नेमिनाथ खोत, डॉ. निनाद नागणे या नामवंत नेत्र तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली या शिबीरामध्ये रुग्णांची तपासणी व उपचार केले जाणार आहेत.
रविवार, दिनांक १० डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १० ते ३ पर्यंत मोफत जयपूर फूट नोंदणी व मोजमाप कृत्रिम हात व पाय या या कार्यक्रमाचे तनपुरे महाराज मठ पंढरपूर येथे आयोजन करण्यात आले आहे. तसेच सामाजिक बांधिलकी जतन करण्याच्या अनुषंगाने पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघांमध्ये आमदार समाधान आवताडे यांच्या संकल्पनेतून प्रथमच सर्वधर्मीय विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सदर सर्वधर्मीय विवाह सोहळ्याचे नाव नोंदणी २१ नोव्हेंबर २०२३ पासून आमदार जनसंपर्क कार्यालय मंगळवेढा व अवताडे शुगर अँड डिस्टिलरीज प्रा लिमिटेड नंदूर येथे सुरू ठेवली जाणार आहे.
२१ नोव्हेंबर २०२३ ते २६ नोव्हेंबर २०२३ दरम्यान दररोज सकाळी ५:३० ते ७:१५ या वेळेत मोफत योग विज्ञान शिबीराचे पतंजली योग परिवार यांनी आयोजन केले आहे. तरी वरील सर्व सामाजिक व आरोग्य कार्यक्रमांमध्ये सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आपल्या परिसरातील बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क
विजयकुमार कांबळे
संपादक
साप्ताहिक पुंडलिक समाचार , वेब पोर्टल आणि PS न्युज चॅनेल
मोबाईल नंबर -; 8888388139/9004537171
Vijaykumarkamble501@gmail.com
إرسال تعليق