पंढरपूर/प्रतिनिधी
श्रीक्षेत्र पंढरपूर येथे दि.२५ ते ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत पंडित श्री प्रदीपजी मिश्रा (सिहोरवाले) महाराज यांचे भव्य शिव महापुराण कथा सोहळ्याचे आमंत्रण घेऊन चेअरमन अभिजीत पाटील थेट अमरावतीत पोचले.
अवघ्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत असणाऱ्या श्री विठ्ठलाच्या नगरीमध्ये आषाढी, कार्तिकी, माघी, चैत्री वारी भरत असून पंढरपूरची आर्थिक उलाढाल यावर बरेच अवलंबून असायचे परंतु श्री शिव महापुराण कथेचे आयोजन केले असता वारीप्रमाणे पंढरपूरला स्वरूप येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.
पंढरपूर येथील चंद्रभागा मैदान येथे पुजनीय पंडित श्री प्रदीपजी मिश्रा महाराज यांचे भव्य शिव महापुराण कथा होणार असुन सदरचा कथा सोहळा दुपारी ०१.०० ते ०४.०० या कालावधीमध्ये होणार आहे. सदर सोहळ्यास येणाऱ्या भाविकांच्या महाप्रसादाची व्यवस्था देखील केलेली आहे. या धार्मिक कार्यक्रमामध्ये अनेक मंडळीनी सहभागी होण्याचे आवाहन पाटील यांनी केले आहे.
पंडीत पंढरपूर येथील चंद्रभागा मैदान येथे पुजनीय पंडित श्री प्रदीपजी मिश्रा महाराज यांचे भव्य शिव महापुराण कथा होणार असुन सदरचा कथा सोहळा दुपारी ०१.०० ते ०४.०० या कालावधीमध्ये होणार आहे. सदर सोहळ्यास येणाऱ्या भाविकांच्या महाप्रसादाची व्यवस्था देखील केलेली आहे. या धार्मिक कार्यक्रमाने नवीन वर्षाचे स्वागत होणार असून श्रीक्षेत्र पंढरपूर येथे या कथा सप्ताहास पंढरपूर शहरामध्ये आषाढी यात्रेप्रमाणे सुमारे १० लाखाच्या आसपास भाविक येणार असल्यामुळे पंढरपूराची आर्थिक उलाढाल वाढणार आहे.
प्रदीप मिश्रा यांची खूप दिवसांपासून पंढरपूर येथे विठ्ठलाच्या पावन नगरीत कथा करण्याचे भाग्य लवकर लाभणार असल्याचे पंडित मिश्रा यांनी सांगितले .
अमरावती येथे चेअरमन अभिजीत पाटील यांच्यासोबत संचालक संतोष कांबळे, संचालक तुकाराम मस्के, संजय खरात, दत्तात्रय गायकवाड, संजय पाटील, प्रविण बाबा भोसले, परवेज मुजावर, शरद घाडगे, नंदकुमार बागल, शंकर साळुंखे यासह मान्यवर उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क
विजयकुमार कांबळे
मुख्य संपादक
साप्ताहिक पुंडलिक समाचार , वेब पोर्टल आणि PS न्युज चॅनेल
मोबाईल नंबर -; 8888388139/9004537171
Vijaykumarkamble501@gmail. com
إرسال تعليق