Pundalik Samachar

प्रजासत्ताक दिनानिमित्त मोफत त्वचारोग निदान शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद



पंढरपूर /प्रतिनिधि

 फडे नर्सिंग होम पंढरपूर येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त त्वचारोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात जवळपास 370 हून अधिक रुग्णांनी याचा लाभ घेतला.

या शिबिराचे उद्घाटन चंदुकाका सराफ ज्वेलर्सचे अतुल जिनदत्त शहा,सौ.संगीता अतुल शहा,डॉ विजय फडे,विक्रम नाईकनवरे,कमल फडे यांच्या हस्ते दीप प्रज्वलाने झाली. 


सध्या प्रदूषणामुळे त्वचा संबंधित आजारांचे प्रमाण वाढते आहे त्यामुळे या आजारा विषयी जनजागृती होणे आवश्यक असल्याचे मत पुणे येथील त्वचारोग तज्ञ  डॉ.अंकिता शहा फडे यांनी सांगितले. 

या शिबिराला पंढरपूर मंगळवेढा विधानसभा आमदार समाधान आवताडे,धाराशिव साखर कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर अमरजित पाटील,युवा नेते प्रणव परिचारक, माजी नगराध्यक्ष दगडूआण्णा धोत्रे,डॉ.अरूण मेणकुदळे,विनोद लटके,दत्तात्रय धोत्रे,अक्षय वाडकर यांच्यासह विविध मान्यवरांनी शिबीराला सदिच्छा भेट दिली.

या शिबिरात पांढरे डाग,केस गळती,कोंडा, मुरम /पिंपल्स,सुरकुत्या या आजारांवर उपचार व मार्गदर्शन करण्यात आले.हे शिबीर यशस्वी होण्यासाठी सिध्दार्थ शहा पुणे, डॉ.राजेश फडे,डॉ.सपना फडे यांनी प्रयत्न केले.

आपल्या परिसरातील बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क 
विजयकुमार कांबळे 
संपादक 
साप्ताहिक पुंडलिक समाचार , वेब पोर्टल आणि PS न्युज चॅनेल 
मोबाईल नंबर -; 8888388139/9004537171
Mail ID..... Vijaykumarkamble501@gmail.com


Post a Comment

أحدث أقدم