पंढरपूर / प्रतिनिधी
उद्या पंढरपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील शिवतीर्थावर सोलापूर लोकसभा मतदारसंघ आणि माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार प्रणिती ताई शिंदे दोन्ही उमेदवारासाठी उद्या दिनांक २६ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी सहा वाजता शिंदे ,पवार आणि मोहिते पाटील या तिघा नेते मंडळींच्या तोफा धडाडणार आहेत.
माढा लोकसभा मतदारसंघ आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघ या दोन्ही मतदार संघामधून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्या " तुतारी चिन्ह " घेऊन लढणारे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ माननीय शरद पवार यांची प्रचार सभा त्याचप्रमाणे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार प्रणिती ताई शिंदे यांच्या प्रचारार्थ शरद पवार, सुशील कुमार शिंदे आणि धैर्यशील मोहिते पाटील , प्रणिती ताई शिंदे यांच्या मुलुख मैदानी तोफा उद्या शिवतीर्थावर धडाडणार आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज चौक जवळील शिवतीर्थावर वरील मान्यवरांच्या प्रचारार्थ सभा होणार आहे. तरी या सभेला हजारोच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी केले आहे.
आपल्या परिसरातील बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क
विजयकुमार कांबळे
मुख्यसंपादक
साप्ताहिक पुंडलिक समाचार , वेब पोर्टल आणि PS न्युज चॅनेल
मोबाईल नंबर -; 8888388139/9004537171
Vijaykumarkamble501@gmail. com
إرسال تعليق