Pundalik Samachar

चेअरमन अभिजीत आबा पाटील यांच्या ४१ व्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन


पंढरपूर/प्रतिनिधी

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे  चेअरमन अभिजीत आबा  पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त 1 ऑगस्ट  रोजी 41 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून  5 जून जागतिक पर्यावरण दिन ते 15 ऑगस्ट  पर्यंत कारखाना परिसरामध्ये दहा हजार झाडे लावण्याचा संकल्प माननीय संचालक मंडळाने घेतला असून पैकी आज अखेर पर्यंत  5000 झाडे लावण्यात आलेले आहेत. या कामी वनविभागाचे त्यांना सहकार्य लाभले  असून उर्वरित पाच हजार झाडे 15 ऑगस्टपर्यंत लावण्यात येणार आहेत.
ती माहिती सत्कार कमिटीचे  अध्यक्ष ओ.जे. अवधूत यांनी दिली आहे.

एक ऑगस्ट सकाळी नऊ वाजता कारखान्याच्या साईडवर डॉक्टर सौ.निशिगंधा माळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या शुभहस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात येणार आहे.दुपारी दीड वाजता अभिजीत आबा पाटील यांच्या अभिष्टचिंतन व सत्कार समारंभ करण्याचे आयोजन केले आहे.

2 तारखेला सकाळी दहा वाजता वन परीक्षेत्र अधिकारी पंढरपूर चैताली झरांडे,ज्योतीताई कुलकर्णी  समाजसेविका उपळाई ,यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात येणार आहे. विठ्ठल प्राथमिक शाळा वेणूनगर येथे इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना खाऊ वाटप, गणवेश वाटप व शालेय साहित्य वाटप करण्याचे आयोजण केलेले आहे.
कारखान्याचे सभासद ,ऊस पुरवठा करणारे शेतकरी ठेकेदार व्यापारी व हितचिंतक बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सत्कार कमिटीच्या वतीने करण्यात आलेले आहे.
👉 आपल्या परिसरातील बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क 
विजयकुमार कांबळे 
मुख्य संपादक 
साप्ताहिक पुंडलिक समाचार , वेब पोर्टल आणि PS न्युज चॅनेल 
मोबाईल नंबर -; 8888388139/9004537171
Vijaykumarkamble501@gmail.

Post a Comment

أحدث أقدم