नांदेड/प्रतिनिधी
महाराष्ट्र शासन कामगार कल्याण विभागाच्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ विभागीय गट कार्यालय लेबर कॉलनी नांदेड येथे दि. 30 जुलै 2024 मंगळवार रोजी गटस्तरीय समरगीत- स्फुर्तीगीत- 2024- 2025 कार्यक्रम संपन्न झाला. राष्ट्राला ज्यांनी समर्पित भावनेने अख्खं आयुष्यभर स्वातंत्र्यापूर्वी व स्वातंत्र्यानंतरच्या काळात ज्यांनी समर्पित भावनेने कार्य केले असे शूरवीर, क्रांतीकारक, स्वातंत्र्यसेनानी, समाजसुधारक (वीररस) यांच्या कार्यास उजाळा देऊन समरगीत- स्फुर्तीगीत 9 स्पर्धक संघाने अतिशय सुंदर असे विविधांगी, विविध प्रकारे, विविध रुपाने गीते सादर केली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रोड्युसर टेक्नीकल माध्यम शास्त्र संकुल स्वा.रा.ती.म. विद्यापीठ नांदेडचे प्रा.डॉ. कैलास यादव हे होते तर विचारपीठावर प्रमुख अतिथी म्हणून कार्यकारी अभियंता महापारेषण जंगमवाडी नांदेडचे उमेश थळंगे, स्वा.रा.ति.म. विद्यापीठाचे प्रा. प्रितम लोणेकर, एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते गुणवंत एच. मिसलवाड, कामगार अधिकारी प्रसाद धस, केंद्र संचालक विलास मेंडके, समरगीत स्पर्धा परिक्षक गंगाधर चित्ते, संतोषसिंह चौधरी, मेघा गायकवाड (जोंधळे) यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी सदर स्पर्धेमध्ये एकूण 9 संघाने सहभाग नोंदवला होता. पैकी 3 संघ विजयी ठरले असून प्रथम क्रमांक ललीत कला भवन लेबर कॉलनी नांदेड संघाला रोख रक्कम 5 हजार, द्वितीय संघ कामगार कल्याण केंद्र चौफाळा यांना रोख रक्कम 3 हजार रुपये व तृतीय संघ कामगार कल्याण केंद्र सिडको या विजेत्या स्पर्धक संघाला रोख 2 हजार रुपये व प्रशस्तीपत्र, पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. उर्वरित संघांना उत्तेजनार्थ प्रशस्तीपत्र वरील सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
याप्रसंगी गुणवंत एच. मिसलवाड, उमेश थळंगे, प्रितम लोणेकर, मेघा गायकवाड (जोंधळे) यांनी आपले विचार मांडले. शेवटी अध्यक्षीय समारोप प्रा.डॉ. कैलास यादव यांनी करुन उपस्थित 9 संघांना मोलाचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कामगार कल्याण अधिकारी प्रसाद धस यांनी केले तर सुत्रसंचालन केंद्र संचालक विलास मेंडके यांनी केले. तर आभार प्रदर्शन विश्वनाथ साखरे यांनी मांडले.
हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी गजानन भोसीकर, साईनाथ राठोड, शेषेराव फाळके, नागेश कल्याणकर, प्रसाद शेळके, मंदा कोकरे, अर्चना शिवनखेडकर, अरुणा गिरी, नामदेव तायडे, उषा गवई, वैजनाथ स्वामी, चंद्रकांत अंभोरे, साऊंड सिस्टीम तथा फोटोग्राफर संजय सोनकांबळे यांनी मोलाचे परिश्रम घेतले.
आपल्या परिसरातील बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क
विजयकुमार कांबळे
मुख्य संपादक
साप्ताहिक पुंडलिक समाचार , वेब पोर्टल आणि PS न्युज चॅनेल
मोबाईल नंबर -; 8888388139/9004537171
Vijaykumarkamble501@gmail. com
إرسال تعليق