सोलापूर /प्रतिनिधी
राज्यातील महादेव, मल्हार, टोकरे, ढोर कोळी जमातीच्या प्रश्नाकडे सातत्याने दुर्लक्ष करणाऱ्या या महायुती सरकारच्या विरोधात कोळी जमातीच्या लोकांनी एल्गार पुकारला असून लवकरच राज्याचा दौरा करणार करणार असल्याचे शिवसेना उपनेते शरद कोळी यांनी सांगितले आहे.
दि.7 रोजी सोलापूर येथे कोळी जमातीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. त्यावेळी ते मार्गदर्शन करतांना बोलत होते.
ते पुढे बोलताना म्हणाले की, जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र सोप्या पद्धतीने मिळावे म्हणून राज्यभर आंदोलन सुरू आहे परंतु हे प्रतिगामी सरकार अन्यायग्रस्त महादेव कोळी जमातीला न्याय देत नाही त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत राज्याच्या 31 जिल्ह्यातील 70 लाख महादेव कोळी बांधव राज्य सरकारच्या विरोधात जाणार आहे या राज्य सरकारच्या विरोधात जनजागृती करण्यासाठी व उपोषणाला बसलेल्या समाज बांधवांचे मनोबल उंचावण्यासाठी राज्याच्या अन्यायग्रस्त जिल्ह्याचा दौरा करणार असल्याचे शरद दादा कोळी यांनी सांगितले आहे. तसेच ग्रामिण भागात प्रस्थापित लोग कोळी जमातीवर अन्याय करतात जातीभेद करतात. तरी समाज बांधवांनी घाबरू नये. हा अन्याय मोडून काढू. बेरोजगार युवकांसाठी भविष्यात रोजगाराच्या संधी निर्माण करून देवु , समाजातील तरुणांना सक्षम करु.जात प्रमाणपत्राच्या संवेदनशील प्रश्नावरती डोळेझाक करणाऱ्या शासनाच्या विरोधात मतदान करण्यासाठी सज्ज रहा .या महायुती सरकारला सत्तेतून खाली घेण्याची ताकद कोळी जमातीत आहे. महाराष्ट्राच्या विधानसभा मतदारसंघात 70 मतदार संघात कोळी समाजाचे निर्णायक मतदान आहे. 65 ते 70 आमदार निवडून ही आणू शकतो आणि पाडू ही शकतो. त्यामुळे या महायुती सरकारला आपण निश्चितपणे पराभूत करूयात असे आव्हान त्यांनी केले आहे .
यावेळी धाडस सामाजिक संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी कोळी जमातीचे अभ्यासक प्रा. बाळासाहेब बळवंतराव यांची तर, द. सोलापुर तालुका अध्यक्षपदी दयानंद कोळी यांची तर अक्कलकोट तालुका महिला आघाडीच्या अध्यक्षपदी रेणुका जमादार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून पुढील कार्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
यावेळी शिवसेना उपनेते शरद (दादा) कोळी, मा. नगराध्यक्ष गणेश (भाऊ) अधटराव , प्रा.बाळासाहेब बळवंतराव सर, संतोष(आण्णा) पाटील ,सुभाष (सर) अधटराव ,अरुण(भाऊ) लोणारी, हणमंतराव माने, भारतीताई कोळी, दादा करकमकर ,दुर्गाताई माने,
राजु खानापुरे,विजयकुमार कांबळे ,चेतन नेहतराव ,सुरज खडाखडे सोलापुर जिल्हयातील महादेव कोळी समाज बांधव, महिला ,युवक मोठया संख्येने उपस्थित होते.
राजु खानापुरे,विजयकुमार कांबळे ,चेतन नेहतराव ,सुरज खडाखडे सोलापुर जिल्हयातील महादेव कोळी समाज बांधव, महिला ,युवक मोठया संख्येने उपस्थित होते.
चौकट......
[ प्रांताधिकारी यांनी आदिवासी आमदारांच्या इशाऱ्यावर नाचण्याचं काम बंद करावे, निःपक्षपाती काम करावे.अन्यथा शरद कोळीच्या स्टाईलने अधिकाऱ्यांना चढलेली मस्ती उतरवणार . महाराष्ट्रातील आदिवासी कोळी समाजाला जाणीवपुर्वक त्रास देण्याचे काम कराल तर याद राखा. तुम्हाला प्रत्येक ठिकाणी तुमच्या चुकीच्या धोरणाच्या विरोधात कात्रीत पकडून तुम्हाला घरचा रस्ता दाखवु.........
शरद (दादा )कोळी शिवसेना उबाठा उपनेते 】
إرسال تعليق