Pundalik Samachar

धाडस सामाजिक संघटनेच्या गाव तेथे शाखा घर तेथे कार्यकर्ता निर्माण करणार-; पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष बाळासाहेब बळवंतराव

 पंढरपूर /प्रतिनिधी 

         धाडस सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शरद दादा कोळी यांनी अन्याय विरुद्ध लढण्यासाठी व प्रस्थापितांना टक्कर देण्यासाठी धाडस सामाजिक संघटनेची स्थापना केली असून गेली 40 वर्ष राज्यातील महादेव, मल्हार, टोकरे ,ढोर कोळी जमाती वरती सातत्याने अन्याय होत आहे.  त्या अन्यायाच्या विरोधात एकजुटीने लढण्यासाठी गाव तेथे शाखा घर तेथे कार्यकर्ता निर्माण करणार असल्याचे मत धाडस सामाजिक संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रा. बाळासाहेब बळवंतराव यांनी सांगितले आहे.

    गेली 50वर्ष झाले राज्याच्या आदिवासी क्षेत्राच्या बाहेरील 31 जिल्ह्यातील महादेव, मल्हार ,टोकरे, ढोर कोळी जमात बांधव जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र सुलभ पद्धतीने देण्याची मागणी करत आहे. परंतु आदिवासी क्षेत्रातून व संपूर्ण राज्याची लोकसंख्या गृहीत धरून निवडून येणारे सर्वपक्षीय 25 आमदार सातत्याने याला विरोध करत आहेत.

           अन्यायग्रस्त महादेव कोळी जमातीचा एक ही आमदार आणि खासदार नसल्यामुळे शासन दरबारी समाजाची बाजू घेणारे कोणीही नाही .आदिवासी 25 आमदार सातत्याने संविधानिक पदावर राहून खोटे आरोप करत आहेत.व कोळी जमातीला सवलती पासून वंचित ठेवत आहेत. या 25 आमदारांच्या वृत्तीला ठेचून काढण्यासाठी व राज्य शासनाला त्याची जागा दाखवून देण्यासाठी धाडस सामाजिक संघटना गाव तेथे शाखा व घर तेथे कार्यकर्ता निर्माण करून हा समाजाच्या आरक्षणाचा लढा मोठ्या ताकदीने उभा करणार आहे. 


राज्य शासन म्हणुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अन्यग्रस्त आदिवासी कोळी जमातीला आरक्षण मिळवून देणे ऐवजी अन्याय करणाऱ्या 25 आमदारांची बाजू घेत आहेत सत्तेसाठी लाचार झालेले हे सरकार आहे. 31 जिल्ह्यातील अन्यायग्रस्त कोळी जमातीची संख्या 70 लाख असून राज्याच्या विधानसभेच्या 65 ते 70 लाख मतदार संघात निर्णय मतदान आहे त्यामुळे आगामी विधानसभेपूर्वी या शासनाने कोळी जमातीच्या जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्राचा प्रश्न न सोडवल्यास या सरकारला उलथवून टाकणार असल्याचे प्रा. बाळासाहेब बळवंतराव यांनी सांगितले आहे.
👉 आपल्या परिसरातील बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क 
विजयकुमार कांबळे 
मुख्यसंपादक 
साप्ताहिक पुंडलिक समाचार , वेब पोर्टल आणि PS न्युज चॅनेल 
मोबाईल नंबर -; 8888388139/9004537171
Vijaykumarkamble501@gmail. com

Post a Comment

أحدث أقدم