पंढरपुर / प्रतिनिधी
गेली दहा वर्ष झाले देवेंद्र फडणवीस यांना राज्यातील अधिसुचित क्षेत्राच्या बाहेर राहणाऱ्या 70 लाख महादेव ,मल्हार ,टोकरे, ढोर कोळी जमातीच्या जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्राचा प्रश्न सोडवण्याची विनंती करूनही आरक्षणविरोधी जातीयवादी देवेंद्र फडवणीस यांनी जाणीवपुर्वक दुर्लक्ष केल्यामुळे त्यांच्याविषयी राज्यातील कोळी समाजात प्रचंड असंतोष निर्माण झालेला असून नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीप्रमाणे आगामी विधानसभा निवडणुकीत ही सत्ता परिवर्तन करणार असल्याचे मत कोळी जमातीचे अभ्यासक व धाडस सामाजिक संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष, संघर्षयोद्धा प्रा.बाळासाहेब बळवंतराव यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले आहे.
अधिसुचित व अधिसुचित क्षेत्राच्या सर्व जिल्हातील सवलतीस पात्र यादीतील 45 जमातीची लोकसंख्या गृहीत धरून 9% प्रमाणे राजकीय आरक्षण निश्चित करून फक्त अधिसूचित क्षेत्रातून आमदार म्हणून निवडून जाणाऱ्या व संपूर्ण महाराष्ट्राची लोकसंख्या दाखवून 9.35% आदिवासी विकास निधीची तरतूद करून घेणारे, 7% नोकरीतील आरक्षण फक्त स्वतःच्या जिल्हयातील 45 पैकी 12 ते 13 जमातीला मिळवून देणारे सत्तेच्या बळावर एकजुटीने राज्य शासनावर दबाव टाकून अधिसूचित क्षेत्राच्या बाहेर राहणाऱ्या महादेव, मल्हार, टोकरे ,ढोर कोळी जमातीला सवलतीपासून वंचित ठेवून समाजात गैरसमज पसरवून कोळी जमाती विषयी खोटा अपप्रचार करू सातत्याने अन्याय करणाऱ्या खोटारड्या नरहरी झिरवाळ,विजयकुमार गावित, सुनील भुसारा, मंजुळा गावित, हिरामण खोसकर,किरण लहामटे, यांच्यासह इतर आमदाराविषयी अनेक वेळा शासन दरबारी निवेदने देऊन तक्रारी करून उपोषण, आंदोलन करुन खोटारडेपणा उघड केला आहे. हा अन्याय दुर करून देवेंद्र फडवणीस यांना न्याय देण्याची मागणी करूनही या खोटारड्या आमदारांची पाठ राखण देवेंद्र फडवणीस आणि मुख्यमंत्री शिंदे यांनी केली असल्याने त्यांच्याविषयी समाजात प्रचंड नाराजी पसरली असून आगामी विधानसभा निवडणुकीत राज्याच्या 65 ते 70 मतदार संघात निर्णायक मतदान असणारे अन्यायग्रस्त महादेव मल्हार टोकरे ढोर कोळी समाज नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीप्रमाणे आगामी विधानसभा निवडणुकीतही राज्यात सत्ता परिवर्तन करणार असल्याचे कोळी जमातीचे अभ्यासक, धाडस सामाजिक संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष, संघर्षयोद्धा प्रा बाळासाहेब बळवंतराव यांनी सांगितले असून जो पक्ष जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्राचा प्रश्न सोडवण्याचे लेखी देईल त्यांनाच मतदान करणार असल्याचे ही ते म्हणाले आहेत.
👉 आपल्या परिसरातील बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क
विजयकुमार कांबळे
संपादक
साप्ताहिक पुंडलिक समाचार , वेब पोर्टल आणि PS न्युज चॅनेल
मोबाईल नंबर -; 8888388139/9004537171
Vijaykumarkamble501@gmail. com
إرسال تعليق