Pundalik Samachar

आमदार गोपीचंद पडळकर यांना आदिवासी विकास मंत्री पद देण्यात यावे . -; प्रा बाळासाहेब बळवंतराव. अन्यायग्रस्त महादेव कोळी जमातीसह 33 जमातींची मागणी

पंढरपूर / प्रतिनिधी

             नुकत्याच झालेल्या विधानसभा  निवडणुकीत 288 जत विधानसभा मतदारसंघातून आ गोपीचंद पडळकर  भरघोस मतांनी निवडून आलेले आहेत. संभाव्य मंत्र्यांच्या यादीमध्ये गोपीचंद पडळकर यांचे नाव आहे . ना एकनाथ शिंदे, ना देवेंद्र फडवणीस यांनी गोपीचंद पडळकर यांना आदिवासी विकास मंत्री पद द्यावे .अशी मागणी महादेव कोळी जमातीचे अभ्यासक प्रा.बाळासाहेब बळवंतराव यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना केली आहे.

   अनुसूचित जमातीच्या सवलतीस पात्र 45 जमाती पैकी अधिसुचित क्षेत्रातील 12 ते 13 जमाती गेली 50 वर्षे झाले आदिवासी सवलतीचा फायदा घेत आहे. अधिसूचित क्षेत्रातून निवडून येणारे 25 आमदार आणि चार खासदार सातत्याने महादेव कोळी सह 33 अन्यायग्रस्त आदिवासी जमातीला बोगस ठरवून सवलती पासून त्यांना वंचित ठेवले आहे. 

            आदिवासी विभागांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार आहे. 2002 ला तत्कालीन आदिवासी विकास मंत्री  विजयकुमार गावित यांनी आदिवासींच्या कल्याणासाठी 245 योजना फक्त कागदावरती राबवून लाभार्थ्याला कोणताही लाभ न देता 6500 कोटी रुपये भ्रष्टाचार केलेला आहे .असा आरोप न्यायमूर्ती गायकवाड समितीने केलेला आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई झाली परंतु मंत्री विजयकुमार गावितला क्लीन चीट कोणी दिली. त्याचे उत्तर अद्याप मिळाले नाही.

 नरहरी झिरवाळ, गावित, तडवी ,पाडवी हे खोटे बोलत आहेत. सत्तेच्या बळावर महाराष्ट्रातील आदिवासी विभागावर यांनी कब्जा केला आहे. लोकशाही ऐवजी हुकूमशाही पद्धतीने हे वागत आहेत. जात प्रमाणपत्र पडताळणी समितीवर व प्रांताधिकारी यांच्यावर दबाव टाकून अन्यायग्रस्त 33 जमातीला जात व जातवैधता प्रमाणपत्र  मिळू दिलेली नाहीत. आदिवासी विभागाचे शुद्धीकरण होणे आवश्यक आहे. महाराष्ट्र मध्ये आमदार गोपीचंद पडळकर एकमेव हेच हे काम करू शकतात.
       महाराष्ट्राची आदिवासीचीं लोकसंख्या गृहीत धरून आमदार निश्चित केले आहेत. खासदार निश्चित केले आहे. त्याचबरोबर 9.35% फंडाची तरतूद केली जात आहे. प्रत्यक्षात मात्र 12 ते 13 जमातीच लाभ घेत आहेत. हा न्याय दूर करण्यासाठी आमदार गोपीचंद पडळकर  यांना राज्याचे आदिवासी विकास मंत्री पद देण्यात यावे. अशी मागणी महादेव कोळी जमातीचे अभ्यासक प्रा. बाळासाहेब बळवंतराव पुंडलिक समाचारशी बोलताना केली आहे.

👉 आपल्या परिसरातील बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क
विजयकुमार कांबळे
संपादक
साप्ताहिक पुंडलिक समाचार , वेब पोर्टल आणि PS न्युज चॅनेल
मोबाईल नंबर -; 8888388139/9004537171
Vijaykumarkamble501@gmail. com

Post a Comment

أحدث أقدم