Pundalik Samachar

महाराष्ट्रातील संपूर्ण धाडस सामाजिक संघटना शरद दादा यांच्या पाठीशी, जशास तसे उत्तर देऊ-; बाळासाहेब बळवंतराव.

पंढरपुर /  प्रतिनिधी

 दक्षिण सोलापूर विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अमर पाटील यांना महाविकास आघाडीनेच उमेदवारी दिली होती .काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी आघाडी  धर्म न पाळता धर्मराज काडादी यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे धाडस सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व शिवसेना उपनेते शरद दादा कोळी हे , प्रणिती शिंदे यांच्यावर भडकले होते. खासदार प्रणिती शिंदे यांच्या कार्यकर्त्यानी त्यांची गाडी फोडण्याची भाषा केली आहे. महाराष्ट्रातील संपूर्ण धाडस सामाजिक संघटना जिल्ह्यातील महादेव कोळी समाज शिवसेना उपनेते व धाडस सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शरद दादा कोळी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे त्यांच्या गाडीला हात लावाल तर जशास तसे उत्तर देऊ असे कोळी जमातीचे अभ्यासक बाळासाहेब बळवंतराव यांनी सांगितले आहे.

 खासदारकीच्या वेळेला शिवसेनेचे अध्यक्ष मा. उद्धव ठाकरे साहेब यांनी प्रणिती शिंदे यांना निवडून आणण्यासाठी जाहीर सभा घेऊन आघाडी धर्माचे तंतोतंत पालन शिवसेनेने केले होते. तसेच सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महादेव कोळी जमातीनेही खासदार प्रणिती शिंदे यांना निवडून आणण्यासाठी पाठिंबा दिला होता. ज्या आनंदराव देवकते यांनी दक्षिण सोलापूर मतदारसंघाचा राजीनामा देऊन सुशीलकुमार शिंदे यांना जागा रिकामी करून दिली होती तसेच एक मागासवर्गीय व्यक्ती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री विराजमान होतेय म्हणून सुशीलकुमार शिंदे यांच्या विरोधात शिवसेनेने उमेदवार दिला नव्हता. त्या आनंदराव देवकातेंच्या मुलाचे पुनर्वसन शिंदे परिवाराने केले नाही त्यांना वाऱ्यावर सोडून दिले आहे. आघाडी धर्म न पाळणाऱ्या पक्ष विरोधी कारवाई करणाऱ्या खासदार प्रणिती शिंदे यांना पक्षाने निलंबित करायला हवे देशाचे माजी गृहमंत्री सुशील कुमार शिंदे साहेब यांनी अत्यंत सुसंस्कृत राजकारण केले आहे. प्रणिती ताई शिंदे यांनी सुद्धा त्यांचा वारसा जपायला हवा. शरद दादा कोळी हे शिवसेनेचे आक्रमक नेते आहेत. त्यांचा जन्मच मुळात संघर्षातून झाला आहे. त्यांना धमकीची भाषा कोणीही वापरू नये.

 जर का शरद दादा कोळी यांच्या गाडीला हात लावाल तर जशास तसे उत्तर देऊ असे धाडस सामाजिक संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष व कोळी जमातीचे अभ्यास बाळासाहेब बळवंतराव यांनी पुंडलिक समाचारशी बोलताना सांगितले आहे.

👉 आपल्या परिसरातील बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क
विजयकुमार कांबळे
मुख्य संपादक
साप्ताहिक पुंडलिक समाचार , वेब पोर्टल आणि PS न्युज चॅनेल
मोबाईल नंबर -; 8888388139/9004537171
Vijaykumarkamble501@gmail. com

Post a Comment

أحدث أقدم