पुंडलिक समाचार
पंढरपूर तालुका पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 45 /2025 बी एन एस कलम 309(6) या रॉबरीच्या गुन्ह्यात तीन आरोपींनी मध्य प्रदेश पासिंगची पिकअप गाडी क्रमांक एमपी 09S3010 या गाडीच्या चालकाला चाकूचा धाक दाखवून चालकाला लाथाबुक्याने मारहाण करून पिकअप गाडी जबरदस्तीने चोरून पिकअप गाडी घेऊन पळून गेले होते. सदर गुन्ह्यामध्ये आरोपीच्या वर्णनावरून एकूण तीन आरोपी ताब्यात घेण्यात आलेले असून त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिलेली आहे. आरोपींची नावे 1) गोविंद लिंबा पवार वय 23 वर्ष राहणार अंकोली तालुका मोहोळ 2) निबालअहमद शेख वय 21 वर्ष राहणार चिंचोली तालुका पंढरपूर 3) संच्या मिटकरी वय 32 राहणार आंबे चिंचोली तालुका पंढरपूर असे तीन आरोपी ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून फिर्यादीचे दोन मोबाईल फोन एक पिकअप गाडी त्याचा क्रमांक MP 09 S3010 असा एकूण किंमत रुपये 11 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल पंढरपूर तालुका पोलिसांनी जप्त करून आरोपींना अटक केलेली आहे.
सदर गुन्हा घडले पासून काही तासात आरोपींना अटक करून गुन्हा उघडकीस आणण्याची कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी , अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर , उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तय्यब मुजावर, पीएसआय भोसले , पोलीस हेडकॉन्स्टेबल गजानन माळी, पोलीस हेडकॉन्स्टेबल विनायक क्षीरसागर, ए एस आय तोंडले, पोलीस हेडकॉन्स्टेबल रोकडे, पोलीस कॉन्स्टेबल सागर गवळी, पोलीस कॉन्स्टेबल आवटी यांच्या पथकाने केली आहे.
👉 आपल्या परिसरातील बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क
विजयकुमार कांबळे
संपादक
साप्ताहिक पुंडलिक समाचार , वेब पोर्टल आणि PS न्युज चॅनेल
मोबाईल नंबर -; 8888388139/9004537171
إرسال تعليق